20 January 2019

News Flash

आशुतोष साहाला विजेतेपद

शिवाजी मंदिर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये आशुतोषला आव्हान होते ते ७५ किलो वजनी गटातील चिन्मय शेजवळचे.

आशुतोष साहा व इंद्रप्रकाश राव

हक्र्युलस जिमच्या ७५ किलोवरील वजनी गटातील विजेत्या आशुतोष साहाने बृहन्मुंबई आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनांनी २१ वर्षांखालील शरीरसौष्ठवपटूंकरिता आयोजित केलेल्या ‘कनिष्ठ मुंबई-श्री’ किताबाला गवसणी घातली. आता २३ जानेवारीला परभणी येथे होणाऱ्या ‘ज्युनियर महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेसाठी तो आपली दावेदारी करणार आहे.

शिवाजी मंदिर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये आशुतोषला आव्हान होते ते ७५ किलो वजनी गटातील चिन्मय शेजवळचे. अपेक्षेप्रमाणे दोघांमध्ये चांगलीच लढत झाली. पंचांनी पुन्हा दोघांची तुलना केली, पण आशुतोष हा चिन्मयपेक्षा सरस ठरला. आशुतोष आणि चिन्मय हे आपली छाप स्पर्धेवर पाडत असताना ५५ आणि ६० किलो गटातील क्षितिज चव्हाण आणि प्रणय ढसाळ यांनीही स्पर्धेवर आपली छाप पाडली. दिव्यांग ‘मुंबई-श्री’ स्पर्धेत पाठारे जिमकोचा इंद्रप्रकाश राव विजेता ठरला, तर नवोदित तंदुरुस्ती विभागामध्ये मध्ये शुभम कांडू हा विजेता ठरला.

* दिव्यांग मुंबई-श्री स्पर्धेचा निकाल

१. इंद्रप्रकाश राव, २. मोहम्मद रियाझ खान, ३. दिलीप मारू, ४. मनोज जाधव, ५. सचिन गिरी – गुरुदत्त जिम

* नवोदित मुंबई तंदुरुस्ती

१. शुभम कानदू, २. शब्द खान, ३. विजय हाप्पे, ४. अबिद रशीद खान, ५. प्राणिल गांधी.

* कनिष्ठ मुंबई-श्री स्पर्धेचा निकाल

५५ किलो : १. क्षितिज चव्हाण, २. अजिंक्य पवार, ३. वैभव मुळीक, ४. धम्रेश कुरियर, ५. रोहित पुजारी.

६० किलो : १. प्रणय ढसाळ, २. गिरीश मुठे, ३. आयुष जाधव, ४. अक्षय काटकर, ५. हेमंत भंडारी.

६५ किलो : १. आकाश घोरपडे, २. प्रफुल्ल घोलप, ३. सिद्धांत खैरनार, ४. रामचंद्र माने, ५. आकाश अडविलकर.

७० किलो : १. प्रसाद म्हामुणकर, २. सर्वेश लोखंडे, ३. अरनॉल्ड डिमेलो, ४. भावेश दादरकर, ५. हरीश शिंदे.

७५ किलो : १. चिन्मय शेजवळ, २. राहुल शिंदे, ३. अक्षय खोत, ४.  चेतन सपाटे, ५. अनिकेत मयेकर.

७५ किलोवरील : १. आशुतोष सहा, २. उबेद पटेल, ३. पंकज पाटील, ४. श्रीकांत गिरी, ५. मोहम्मद इब्राहिम.

First Published on January 13, 2018 3:03 am

Web Title: ashutosh saha won junior mumbai shree bodybuilding competition