चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावात उभारलेल्या ५७८ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात ३३७ धावांपर्यंत मजल मारता आली. सुंदर, पंत आणि पुजारा यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघानं सन्माजनक धावसंख्या उभारली. पहिल्या डावात २४१ धावांनी भारतीय संघा पिछाडीवर असताना इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विन यानं इंग्लंडला धक्का दिला.

कर्णधार विराट कोहलीनं दुसऱ्या डावातील पहिलं षटकं अश्विनकडे सोपवलं होतं. अश्विन यानं पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स याला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केलं. दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बळी घेत ११४ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला.

आणखी वाचा- विराटचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय; पाहा आकडेवारी

आणखी वाचा- IND vs ENG : इशांतची ऐतिहासिक कामगिरी, ३०० बळींचा टप्पा केला पार

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मागील ११४ वर्षांत डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकाही फिरकी गोलंदाजाला बळी घेता आला नव्हता. पण चेन्नई कसोटी अश्विन यानं पहिल्या चेंडूवर बळी घेत विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी १८८८मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९०७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल ११४ वर्षानंतर अश्विननं हा मान पटकावला.