रविचंद्रन अश्विनचा कधीच मत्सर वाटला नाही, असे स्पष्टीकरण भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने मंगळवारी केले.

भारतीय संघात हरभजनची जागा अश्विनने घेतली. सध्या अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जगातील सर्वोत्तम ऑफ-स्पिन गोलंदाज मानले जातात. हरभजनने अद्याप क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली नसली, तरी २०१६मध्ये तो भारताकडून अखेरचा सामना खेळला आहे. अश्विनबाबत हरभजन म्हणाला, ‘‘मला अश्विनचा मत्सर वाटतो, असे बऱ्याच जणांना वाटते. त्यांना काय म्हणायचे, ते म्हणो. परंतु सध्या तरी अश्विन हाच सर्वोत्तम ऑफ-स्पिन गोलंदाज आहे.’’