News Flash

ज्वाला-अश्विनीला पराभवाचा धक्का

हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसने अजय जयरामला २१-१८, १९-२१, २१-१९ असे नमवले.

| March 10, 2016 04:06 am

प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीसह एच.एस. प्रणॉयला सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले.

नेदरलँड्सच्या समंथा बार्निग आणि इरिस तेबलिंग जोडीने ज्वाला आणि अश्विनी जोडीवर २६-२४, २१-१७ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये  समंथा-इरिस जोडीने सरशी साधली. दुसऱ्या गेममध्ये मात्र ज्वाला-अश्विनी जोडीचा खेळ मंदावला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या क्षे साँगने प्रणॉयवर २२-२०, २१-१५ अशी मात केली. पुरुष दुहेरीत किआन किट कू आणि बून हेआँग तान जोडीने मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीचा १६-२१, २१-१३, २१-१५ असा पराभव केला. हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसने अजय जयरामला २१-१८, १९-२१, २१-१९ असे नमवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 4:06 am

Web Title: ashwini jwala loses in england badminton competitionc
Next Stories
1 नेयमारचे प्राधान्य ऑलिम्पिक -डुंगा
2 भारताला पराभूत करणं कठीण- केन विल्यमसन
3 भारत-पाकिस्तान सामना धरमशालाऐवजी कोलकात्यात
Just Now!
X