23 September 2020

News Flash

भारताचे आव्हान संपुष्टात

सायना, सिंधू, समीर उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत

सायना, सिंधू, समीर उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत

आशियाई  बॅडमिंटन अजिंक्यपद  स्पर्धेमध्ये तब्बल ५४ वर्षांनी विजेतेपद मिळवण्याचे भारतीय बॅडमिंटनपटूंचे स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकले नाही. महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल, तर पुरुषांमध्ये समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने भारतालाही स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

महिलांच्या गटात जपानच्या तृतीय मानांकित अकानी यामागुचीने संघर्षपूर्ण सामन्यात सातव्या मानांकित सायनाला तीन गेममध्ये पराभूत केले. एक तास नऊ मिनिटे चाललेल्या या सामन्यात यामागुचीने सायनाला २१-१३, २१-२३, २१-१६ असे नमवले.

चीनच्या बिगरमानांकित काई यानयानने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चौथ्या मानांकित सिंधूला २१-१९, २१-१९ असे पराभूत करत धक्कादायक विजयाची नोंद केली. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सहाव्या स्थानी असणाऱ्या सिंधूला नेस्तनाबूत करण्यासाठी यानयानला फक्त ३१ मिनिटांचा अवधी लागला.

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या दुसऱ्या मानांकित शी युकीने समीरला २१-१०, २१-१२ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. समीरव्यतिरिक्त एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किदम्बी श्रीकांतचे आव्हान बुधवारी पहिल्या फेरीतच संपुष्टात आले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 2:37 am

Web Title: asia badminton championship indian challenge over as sindhu saina and sameer lose
Next Stories
1 अमित आणि पूजाची सुवर्णकिमया!
2 महिला ‘आयपीएल’मधून ऑस्ट्रेलियाची माघार
3 विनेश, साक्षीला कांस्यपदक
Just Now!
X