आशिया चषकातील अफागाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामी फलंदाजीला उतरलेल्या अजिंक्य रहाणेने संघात चौथ्या स्थानावर फलंदाजी करणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे.
येत्या टी-२० विश्वचषकात अजिंक्य रहाणेला संघात चौथे स्थानी फलंदाजी करावी लागण्याची शक्यता आहे. यावर अजिंक्यने संघात चौथ्या स्थानी फलंदाजी करणे आव्हानात्मक असल्याचे म्हटले. अजिंक्य म्हणतो, सलामीला फलंदाजी करताना तुम्हाला पहिली दहा षटके आणि नव्या चेंडूला फटके मारण्यास मिळतात. त्यामानाने दबावही कमी असतो. परंतु, चौथ्या स्थानावर संघाची धावसंख्या सावरण्याचे काम आव्हानात्मक ठरते. चौथ्या स्थानी खेळताना तुम्हाला वेगळया भूमिकेने फलंदाजी करावी लागते. टी-२० सामन्यांत सलामी फलंदाजी करण्याचा माझा अनुभव आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर टी-२० सामन्यांत फलंदाजी करण्याची जोरदार तयारी मला करावी लागणार आहे. याकडे मी आव्हानात्मक दृष्टीने पाहतो असेही अजिंक्य म्हणाला.