हशमतुल्ला शाहिदीची ९२ चेंडूत ५८ धावांची संयमी खेळी आणि गोलंदाजांचा भेदक मारा या एकत्रित कामगिरीच्या बळावर अफगाणीस्तानने आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशला नमवण्याची किमया केली.

हशमतुल्ला ५८ धावांवर बाद झाल्यावर अफगाणीस्तानने तीन विकेट्स झटपट गमावले. परंतु त्यानंतर अंतीम षटकांत राशिद खानचे ५७ (३२) अर्धशतक व गुलबदीन नैबच्या ४२(३८) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अफगाणीस्तानने ७ बाद २५५ धावांची मजल मारली.  प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशला फक्त ११९ धावाच करता आल्या. परिणामी त्यांना तब्बल १३६ धावांनी पराभव स्विकारावा लागला. राशिद खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. पारंपरिक फटक्यांऐवजी आत्मघातकी फटके खेळण्यावर भर दिल्याने बांगलादेशी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.