आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ८ गडी राखून मात केली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ १६२ धावांमध्ये गारद झाला. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधव यांनी पाकिस्तानचे प्रत्येकी ३-३ फलंदाज माघारी धाडले. पाकिस्तानने दिलेलं आव्हान भारतीय फलंदाजांनी २ गड्यांच्या मोबदल्यात अगदी सहज पार केलं. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने केलेल्या कामगिरीबद्दल त्याला सामनाविराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर हॉटेलवर परतलेल्या टीम इंडियाने केक कापून सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनमध्ये भुवनेश्वर कुमारमधला ‘प्रिन्स दादा’ सर्वांना दिसून आला. भुवनेश्वरने चक्क तलवारीने केक कापला. टीम इंडियाच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

अ गटात दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारताची Super 4 गटात, रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानशी लढत होणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान ब गटात बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन संघांनी Super 4 गटात प्रवेश मिळवला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2018 bhuvneshwar cuts cake with sword after indias win over pakistan
First published on: 21-09-2018 at 15:55 IST