08 August 2020

News Flash

Asia Cup 2018 Final : महेंद्रसिंह धोनीचा आणखी एक विक्रम, दिग्गज यष्टीरक्षकांच्या पंक्तीत मिळवलं स्थान

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल्या ८०० व्या बळीची नोंद

मश्रफी मोर्ताझाला बाद करताना धोनी

भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झालेली आहे. दुबईत खेळवण्यात येणाऱ्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात, बांगलादेशविरुद्ध धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला यष्टींमागचा ८०० वा बळी मिळवला आहे. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत धोनी आता तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये पहिल्या स्थानी मार्क बाऊचर ९९८ बळींसह तर दुसऱ्या स्थानी अॅडम गिलख्रिस्ट ९०५ बळींसह कायम आहेत.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : बांगलादेशच्या लिटन दासची एकाकी झुंज, झळकावलं वन-डे मधलं पहिलं शतक

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, बांगलादेशी सलामीवीरांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र पहिला गडी माघारी परतल्यानंतर बांगलादेशच्या डावाला खिंडार पडलं. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या पवित्र्यात असलेल्या बांगलादेशी कर्णधार मश्रफी मोर्ताझाला धोनीने चपळाईने यष्टीचीत करुन ८०० व्या बळीची नोंद केली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 11:14 pm

Web Title: asia cup 2018 final ms dhoni brings up 800 dismissals in internationals with blink and you miss it stumping watch video
Next Stories
1 Asia Cup 2018 Final : बांगलादेशच्या लिटन दासची एकाकी झुंज, झळकावलं वन-डे मधलं पहिलं शतक
2 गरीब आणि वंचित मुलांमध्ये संघर्षाची सर्वाधिक ताकद-माईक टायसन
3 Korea Open Badminton : नोझुमी ओकुहाराची सायना नेहवालवर मात, भारताच्या ‘फुलराणी’चं आव्हान संपुष्टात
Just Now!
X