Asia Cup 2018 Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर ४ फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही. कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. २५३ धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि भारताचे सर्व गडी तंबूत परतले. IPLमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या रशीद खानने दडपणाच्या क्षणी उत्तम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला मानसिक विजय मिळवून दिला. शतकी खेळी करणाऱ्या मोहम्मद शेहजादला सामनावीर घोषित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. अंबाती रायडू आणि लोकेश राहुल दोघांनी अर्धशतकी खेळी करत ११० धावांची सलामी दिली. रायडू ५७ धावांवर तर राहुल ६० धावांवर बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने एका बाजूने खिंड लढवल ४४ धावा केल्या. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. महेंद्रसिंग धोनी (८), मनीष पांडे (८), केदार जाधव (१९), दीपक चहर (१२), कुलदीप यादव (९) आणि सिद्धार्थ कौल (०) हे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. अखेर रवींद्र जडेजाने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत भारताला विजयासमीप नेले. पण १ धावेची आवश्यकता असताना तो बाद झाला आणि भारताचा डाव संपुष्टात आला.

तत्पूर्वी, सलामीवीर मोहम्मद शेहजादने झळकावलेलं शतक आणि अखेरच्या फळीत अष्टपैलू मोहम्मद नबीने त्याला दिलेली साथ या जोरावर अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी २५३ धावांचे आव्हान दिले. अफगाणिस्तानने ५० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात २५२ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी घेण्याचा निर्णय मोहम्मद शेहजादने सार्थ ठरवला. शेहजादने एकहाती भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत संघाला झटपट धावा काढून दिल्या. पहिल्या षटकापासून शेहजादने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. पहिल्या विकेटसाठी शेहजाद आणि जावेद अहमदी यांच्यात ६५ धावांची भागीदारीही झाली. मात्र रविंद्र जाडेजाने अहमदीला माघारी धाडत अफगाणिस्तानची जोडी फोडली.

यानंतर अफगाणिस्तानचे ४ फलंदाज फारशी चमकदार कामगिरी न करता माघारी परतले. मात्र दुसऱ्या बाजूने मोहम्मद शेहजादने बाजू लावून धरत संघाची झुंज सुरु ठेवली. अखेर केदार जाधवने मोहम्मद शेहजादला माघारी धाडत अफगाणिस्तानला आणखी एक धक्का दिला. शेहजादने १२४ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने मोहम्मद नबीने चांगली फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. नबीने ५६ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. भारताकडून रविंद्र जाडेजाने ३ तर कुलदीप यादवने २ बळी घेतले.

Live Blog

Highlights

  • 19:51 (IST)

    अखेर शतकवीर शेहजाद माघारी, केदार जाधवने फोडली जोडी

    ???????? ?????????? ????? ????? ??????????? ???? ??? ??? ?????? ??????, ????? ?????? ?????? ???

  • 19:04 (IST)

    मोहम्मद शेहजादचं शतक, अफगाणिस्तानचा डाव सावरला

    ??????? ????????? ??????? ???????? ??????? ??????? ???????? ???????? ??? ?????? ??? ??????. ??????? ???????? ???? ?????? ???????

  • 17:48 (IST)

    अफगाण सलामीवीरांची आक्रमक सुरुवात

    ??????? ???????? ????????, ?????? ??????????? ???????? ??? ????? ???? ???????

01:00 (IST)26 Sep 2018
भारताचे ९ गडी तंबूत, अफगाणिस्तानचे सामन्यात 'कमबॅक'

भारताचे ९ गडी तंबूत, अफगाणिस्तानचे सामन्यात 'कमबॅक'

00:56 (IST)26 Sep 2018
कुलदीप यादव धावचीत, अफगाणिस्तानचे सामन्यात 'कमबॅक'

कुलदीप यादव धावचीत, अफगाणिस्तानचे सामन्यात 'कमबॅक'

00:39 (IST)26 Sep 2018
दीपक चहर त्रिफळाचित, अफगाणिस्तानचे सामन्यात कमबॅक

आपला पहिला एकदिवसीय सामना खेळणारा खेळाडू दीपक चहर हा त्रिफळाचित झाला. आफताब आलम याने उत्तम गोलंदाजी करत भारताचा सातवा गडी माघारी धाडला. दिपकने १४ चेंडूत १२ धावा केल्या.

00:09 (IST)26 Sep 2018
केदार धावचीत, कार्तिक पायचीत; भारताचे ६ गडी तंबूत

भारताला एकापाठोपाठ एक असे दोन धक्के बसले. कार्तिकने टोलवलेला चेंडू गोलंदाजाच्या हातावर लागून स्टंपवर लागला. त्यावेळी केदार क्रिजच्या बाहेर होता. त्यामुळे तो धावचीत झाला. त्यानंतर लगेचच कार्तिकही पायचीत झाला. कार्तिकला पंचांचा निर्णय मान्य नव्हता, पण भारताकडे रिव्ह्यू शिल्लक नसल्याने त्याला तंबूत परतावे लागले.

23:29 (IST)25 Sep 2018
मनीष पांडे माघारी, भारताचा चौथा गडी तंबूत

आफताब आलम याच्या गोलंदाजीवर मनीष पांडे झेलबाद झाला. मोहम्मद शहजाद याने अप्रतिम झेल टिपला. मनीष पांडे १५ चेंडूत ८ धावा करून बाद झाला.

23:19 (IST)25 Sep 2018
भारताला तिसरा धक्का, अनुभवी धोनी तंबूत

जावेद अहमदी याने महेंद्रसिंग धोनीला पायचीत केले. भारताला तिसरा धक्का बसला. धोनी ८ धावांवर बाद झाला.

22:46 (IST)25 Sep 2018
भारताला दुसरा धक्का, लोकेश राहुल माघारी

राशिद खानच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळताना लोकेश राहुल माघारी

22:32 (IST)25 Sep 2018
लोकेश राहुलचं अर्धशतक

लोकेश राहुलने आपली उपयुक्तता सिद्ध करत अर्धशतकी खेळी केली आहे. भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल

22:32 (IST)25 Sep 2018
भारताला पहिला धक्का, अंबाती रायडू माघारी

मोहम्मद नाबीच्या गोलंदाजीवर रायडू झेलबाद, भारताचा पहिला गडी माघारी

22:30 (IST)25 Sep 2018
अंबाती रायडूचं अर्धशतक

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत रायडूचं अर्धशतक, भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल

22:29 (IST)25 Sep 2018
भारतीय सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात

लोकेश राहुल आणि अंबाती रायडून जोडीने सावध सुरुवात करुन संघाला ५० धावांचा टप्पा गाठून दिला.

22:29 (IST)25 Sep 2018
अफगाणिस्तानची २५२ धावांपर्यंत मजल

५० षटकात अफगाणिस्तान ८ गड्यांच्या मोबदल्यात २५२, भारताला विजयासाठी २५३ धावांचं आव्हान

20:29 (IST)25 Sep 2018
मोहम्मद नबी माघारी, अफगाणिस्तानचा आठवा फलंदाज तंबूत

खलिल अहमदच्या गोलंदाजीवर मोहम्मद नबी माघारी

20:18 (IST)25 Sep 2018
मोहम्मद नबीचं अर्धशतक, अफगाणिस्तानची आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल

अखेरच्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेऊन नबीचं अर्धशतक

20:12 (IST)25 Sep 2018
नबी - नजीबउल्ला जोडी फोडण्यात भारताला यश

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर नजीबउल्ला पायचीत होऊन माघारी, अफगाणिस्तानला सातवा धक्का

19:58 (IST)25 Sep 2018
मोहम्मद नबी - नजीबउल्ला झरदान जोडीने संघाचा डाव सावरला

नबी-नजीबउल्ला जोडीच्या फटकेबाजीमुळे अफगाणिस्तानने ओलांडला २०० धावांचा टप्पा

19:51 (IST)25 Sep 2018
अखेर शतकवीर शेहजाद माघारी, केदार जाधवने फोडली जोडी

फटकेबाजी करण्याच्या नादात दिनेश कार्तिकच्या हाती झेल देत शेहजाद माघारी, केदार जाधवला मिळाला बळी

19:05 (IST)25 Sep 2018
अफगाणिस्तानला धक्का, पाचवा गडी माघारी

दिपक चहरच्या गोलंदाजीवर गुलबदीन नैब माघारी, चहरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला बळी

19:04 (IST)25 Sep 2018
मोहम्मद शेहजादचं शतक, अफगाणिस्तानचा डाव सावरला

पाचव्या विकेटसाठी मोहम्मद शेहजादने गुलबदीन नैबसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दरम्यान शेहजादने शतकी खेळीही साकारली

18:15 (IST)25 Sep 2018
अफगाणिस्तानचा कर्णधारही माघारी परतला, कुलदीप यादवला आणखी एक बळी

अझगर अफगाण कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत. अफगाणिस्तानचा डाव कोलमडला

18:13 (IST)25 Sep 2018
अफगाणिस्तानला तिसरा धक्का

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात हश्मतुल्ला शहिदी यष्टीचीत होऊन माघारी, अफगाणिस्तानला तिसरा धक्का

18:03 (IST)25 Sep 2018
अफगाणिस्तानला दुसरा धक्का, रेहमत शहा माघारी

रविंद्र जाडेजाने रेहमत शहाचा त्रिफळा उडवत भारताला दुसरं यश मिळवून दिलं.

17:55 (IST)25 Sep 2018
अफगाणिस्तानची जोडी फुटली, जाडेजाला मिळालं पहिलं यश

एकाबाजूने मोहम्मद शेहजाद फटकेबाजी करत असताना जावेद अहमदीला जम बसवता येत नव्हता. अखेर रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर अहमदी यष्टीचीत होऊन माघारी.  अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू बाद

17:48 (IST)25 Sep 2018
अफगाण सलामीवीरांची आक्रमक सुरुवात

मोहम्मद शेहजादची फटकेबाजी, भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत साजरं केलं अर्धशतक

16:59 (IST)25 Sep 2018
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

भारताने अखेरच्या सामन्यासाठी संघात महत्वाचे बदल केले आहेत. रोहित ऐवजी धोनी संघाचं नेतृत्व करेल. याचसोबत लोकेश राहुलला संघात जागा देण्यात आली असून दिपक चहरही आजच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2018 india vs afghanistan super 4 live updates
First published on: 25-09-2018 at 16:45 IST