भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील कोणताही सामना नेहमीच उत्कंठापूर्ण वातावरणात खेळला जातो. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी तब्बल १५ महिन्यानंतर आमने-सामने उभे ठाकणार आहेत. आशिया खंडातील या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये १९ तारखेला यूएईमध्ये महासंग्राम रंगणार आहे. यूएईमध्ये पाकिस्तान संघाला भारताच्या तुलनेमध्ये प्रेक्षकांचा पाठिंबा आधीक असणार आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून यूएई पाकिस्तान संघाचे होम ग्राऊंड आहे.

आशिया चषकांमध्ये सहा संघ सहभागी असले तरी प्रेक्षकांना भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता लागलेली आहे. दोन्ही संघामध्ये अखेरचा सामना चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान झाला होता. त्यामध्ये पाकिस्तान संघाने भारताचा १८० धावांनी पराभव केला होता. १९ तारखेला होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारत या पराभवची परतफेड करण्यास उत्सुक असेल. या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या अखेरच्या दहा सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा वेळा पराभव केला आहे. आशिया चषकांमध्ये भारताने ४३ सामने खेळले आहेत. यामध्ये भारताला २६ विजय मिळवता आले आहेत. तर १६ पराभवचा सामना भारताला करावा लागला आहे. पाकिस्तान संघाने आशिया चषकात ४० पैकी २४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर १५ सामन्यात पराभव पाहिला आहे. भारत आणि पाकिस्तानची आशिया चषकातील विजयाची सरासरी जवजवळ सारखीच आहे. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान १२ वेळा आमने-सामने आला आहे. यामध्ये भारताने सहा वेळा तर पाकिस्तान संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

(Asia Cup 2018 : सहा वेळा भारताने चषकावर कोरलेय नाव, जाणून घ्या काही रंजक गोष्टी)

भारतीय संघाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भारतीय नियमक मंडळाने आशिया चषकासाठी नियमित कर्णधार विराट कोहलीला आराम दिला आहे. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून एकदिवसी, टी-२० आणि कसोटी संघात सहभागी आहे. पुढील काही महत्वाच्या दौऱ्याचा विचार करून बीसीसीआयने विराट कोहलीला आराम दिला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. निदहास चषकामध्ये रोहित शर्माने आपले नेतृत्वगुण सिद्ध केले होते. रोहित शर्माकडे आयपीएलमधील कर्णधारपदाजा दांडगा अनुभव आहे.

(आणखी वाचा : Asia Cup 2018 : सहा संघामध्ये आशिया चषकासाठी लढत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणता खेळाडू)

या स्पर्धेमध्ये रोहित शर्माला आपल्या बॅटने प्रतिस्पर्ध्या संघासमोर अवाहन उभे करायचे आहे. शिवाय नेतृत्वाने भारतीय नियमक मंडळाला प्रभावित करण्याचे अव्हानही त्याच्यासमोर असेल. रोहित शर्माच्या मदतीला अनुभवी एम.एस. धोनीही असेल. तसेच दुखपतीतून सावरल्यानंतर केदार जाधव पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची तयारी प्रत्येक संघाने सुरू कोली आहे. आपल्या खेळाने निवडकर्त्यांना प्रभावित करण्याचे काम प्रत्येक खेळाडू करत आहे. भारतीय संघामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

(जाणून घ्या आशियाई चषकासाठी भारतीय संघात निवड झालेल्या खलिल अहमद विषयी)

२०१६ मध्ये आशिया चषक टी-२० पद्धतीने खेळवला होता. पण यावर्षी पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्याच्या पद्धतीने खेळवला जाणार आहे. यावेळी आशिया चषकांमध्ये तीन संघाचे दोन ग्रुप करण्यात आले आहेत. भारत ब गटामध्ये पाकिस्तान आणि हाँगहाँगसोबत आहे. तर अ गटामध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगानिस्तान आहे. पहिल्या ग्रुप लढतीनंतर सर्वोतम चार संघ पुढील फेरीत पात्र होणार आहेत. त्याचे नाव ‘सुपर फोर’ असे ठेवण्यात आले आहे. या फेरीतून सर्वोत्म दोन संघामध्ये अंतिम लढत होणार आहे. भारत आशिया चषकाची सुरूवात १८ तारखेला हाँगहाँसोबत करणार आहे. तर १९ तारखेला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. सर्वांची उत्सुकता भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे आहे. उद्यापासून आशिया चषकाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे क्रिडारसिंकासाठी भारत-पाकिस्तान सामन्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.