आशिया चषकातील साखळी सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६३ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी लिलया पार केलं. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली, त्याला सलामीवीर शिखर धवनने ४६ धावा काढून चांगली साथ दिली. अर्धशतकी खेळी झाल्यानंतर रोहित शर्मा शादाब खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. तर फईम अश्रफने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर विजयासाठी आवश्यक असणारं आव्हान अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक जोडीने पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. फईम आणि शादाबचा अपवाद वगळता एकही गोलंदाज आपली छाप पाडू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याआधी भुवनेश्वर कुमार, केदार जाधव आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ अवघ्या १६२ धावांमध्ये कोलमडला. दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकात हाँग काँगवर मात केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. काही ठराविक भागीदाऱ्यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचा डाव आकार घेऊ शकला नाही. भुवनेश्वर कुमारने नव्या चेंडूवर खेळताना पाकिस्तानला सुरुवातीला दोन धक्के दिले. यानंतर बाबर आझम आणि शोएब मलिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला.

मात्र कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाबर आझम त्रिफळाचीत होऊन माघारी परतला आणि पाकिस्तानची घसरगुंडी सुरु झाली. यानंतर केदार जाधवच्या कामचलाऊ गोलंदाजीवर मोठे फटके खेळण्याच्या नादात पाकचे फलंदाज विकेट गमावून माघारी परतले. अखेरच्या फळीत मोहम्मद आमीर आणि फईम अश्रफ यांनी ३७ धावांची छोटेखानी भागीदारी रचत संघाला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र बुमराह आणि भुवनेश्वरने पाकिस्तानच्या शेपटाला फारसं वळवळण्याची संधीच दिली नाही. अखेर ४३.१ षटकात पाकिस्तानचा संघ १६२ धावांत माघारी परतला.

Live Blog

Highlights

  • 18:40 (IST)

    पाकिस्तानचा तिसरा गडी माघारी, बाबर आझम त्रिफळाचीत

    ???? ??????????? ?????? ???? ???????? ??????? ??. ?????? ???????? ?????????? ???? ??? ?????????? ???? ??????. ? ??????? ????? ??????? ?????. ???-????????? ??????? ????????? ?? ??????? ????????

  • 18:28 (IST)

    हार्दिक पांड्या जायबंदी, भारताला मोठा धक्का

    ?? ???? ??????? ????? ????? ???? ?????? ??????? ??????? ???????, ????????? ??????????? ??????????? ????. ????????? ?????????? ???

  • 18:07 (IST)

    बाबर आझम - शोएब मलिक जोडीने संघाचा डाव सावरला

    ????? ??? ?????? ?????? ??????????? ???? ?????? ?????? ??????????? ???????? ??? ?????? ??? ????????? ??????? ????. ??????? ?????? ???? ??????? ?????? ?????? ??? ????. ?????? ????????????? ??????? ????????? ?? ??????? ????????

23:13 (IST)19 Sep 2018
विजयाची औपचारिकता रायडू - कार्तिक जोडीकडून पूर्ण

दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडू जोडीने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारत ८ गडी राखून विजयी

22:24 (IST)19 Sep 2018
ठराविक अंतराने शिखर धवन माघारी, भारताला दुसरा धक्का

फईम अश्रफच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेलबाद, अवघ्या ४ धावांनी शिखरचं अर्धशतक हुकलं

22:05 (IST)19 Sep 2018
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

अर्धशतक झळकावल्यानंतर फिरकीपटू शादाब खानच्या गोलंदाजीवर रोहित त्रिफळाचीत होऊन माघारी. शादाबचा गुगली चेंडू रोहितला समजलाच नाही.

22:04 (IST)19 Sep 2018
रोहित शर्माचं अर्धशतक

पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत रोहित शर्माचं आक्रमक अर्धशतक, भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल

21:45 (IST)19 Sep 2018
भारतीय संघाची संयमी सुरुवात

रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने पाकिस्तानी गोलंदाजांची खेळी संयमीपमे खेळून काढत भारताला चांगली सुरुवात करुन दिली आहे. रोहितने मैदानावर आपले पाय स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करत पाकच्या गोलंदाजांवर दबाव आणायला सुरुवात केली आहे.

20:09 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानचा डाव संपुष्टात, उस्मान खान त्रिफळाचीत

उस्मान खानचा त्रिफळाचीत होऊन माघारी, पाकिस्तानचा संघ १६२ धावांवर संपुष्टात. भारताला विजयासाठी १६३ धावांचं आव्हान

20:07 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानचा नववा गडी बाद

भुवनेश्वरच्या खात्यात आणखी एक बळी, हसन अली बाद

20:01 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश, आठवा गडी माघारी

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फईम अश्रफ बाद

20:01 (IST)19 Sep 2018
मोहम्मद आमिर आणि फईम अश्रफमध्ये छोटेखानी भागीदारी

आमिर आणि अश्रफमध्ये ३७ धावांची छोटेखानी भागीदारी, पाकिस्तानने ओलांडला १५० धावांचा टप्पा

19:27 (IST)19 Sep 2018
केदार जाधव चमकला, पाकचा सातवा गडी माघारी

केदार जाधवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात शादाब खान यष्टीचीत, पाकिस्तानचा सातवा गडी माघारी

19:08 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानचा डाव गडगडला, सहावा गडी माघारी

केदार जाधवच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा आसिफ अली धोनीकडे झेल देत माघारी. पाकिस्तानचा सहावा गडी माघारी

19:04 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानला आणखी एक धक्का, शोएब मलिक धावबाद

अंबाती रायडूने केलेल्या अचूक फेकीमुळे शोएब मलिक धावबाद होऊन माघारी. पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी

18:53 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानचा चौथा गडी माघारी, कर्णधार सरफराज अहमद माघारी

केदार जाधवच्या गोलंदाजीवर मनिष पांडेने सीमारेषेवर सरफराज अहमदचा सुरेख झेल पकडला. पाकिस्तानचा चौथा गडी माघारी

18:40 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानचा तिसरा गडी माघारी, बाबर आझम त्रिफळाचीत

अखेर पाकिस्तानची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर बाबर आझम त्रिफळाचीत होऊन माघारी. ३ धावांनी आझमचं अर्धशतक हुकलं. आझम-मलिकमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी

18:28 (IST)19 Sep 2018
हार्दिक पांड्या जायबंदी, भारताला मोठा धक्का

१८ व्या षटकातला पाचवा चेंडू टाकत असताना हार्दिक पांड्या जायबंदी, हार्दिकला स्ट्रेचवरुन मैदानाबाहेर नेलं. भारताच्या चितेंमध्ये वाढ

18:07 (IST)19 Sep 2018
बाबर आझम - शोएब मलिक जोडीने संघाचा डाव सावरला

पहिले दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर शोएब मलिकने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत संघाचा डाव सावरण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने बाबर आझमनेही मलिकला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी

17:22 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानचा दुसरा गडी माघारी, फखर झमान माघारी

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फखर झमान मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी. पाकिस्तानचा दुसरा गडी तंबूत परतला

17:12 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानचा पहिला गडी बाद, इमाम उल हक तंबूत

भुवनेश्वर कुमार याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानने पहिला गडी गमावला. माजी कर्णधार इंझमाम उल हक याचा भाचा असलेला इमाम उल हक हा २ धावांवर बाद झाला. धोनीने यष्ट्यांमागे त्याचा झेल टिपला

16:47 (IST)19 Sep 2018
पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

हायव्होल्टेज सामन्यात पाक कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात आज पाकने आपल्या संघात कोणतेही बदल केलेले नाहीयेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2018 india vs pakistan live updates
First published on: 19-09-2018 at 16:41 IST