चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा २०१७ च्या अंतिम फेरीत भारतीय संघाला दारुण पराभव पत्करल्यानंतर आज पहिल्यांदाच पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान बुधवारी एकमेकांसमोर उभे ठाकतील. आज संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष या सामन्याकडे वेधले जाईल. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे आणि लढतीच्या विशेष दडपणामुळे या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच या लढतीत विजय मिळवून चॅम्पियन्स करंडकातील पराभवाची परतफेड करण्याचा निर्धार करुनच भारतीय संघ मैदानात उतरले. मात्र पाकिस्तानसाठी होम ग्राऊण्ड म्हणून समजल्या जाणाऱ्या दुबईतील मैदानात हा सामना होणार असल्याचे पाकिस्तानचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. तरी आत्तापर्यंत आशिया चषकामधील आकडेवारी काय सांगत आहे यावर एक नजर टाकूयात.

आत्तापर्यंतचा एकदिवसीय सामन्यांची आकडेवारी

एकूण सामने – १२९
भारताने जिंकलेले सामने – ५२
पाकिस्तानने जिंकलेले सामने – ७३
अनिर्णित राहिलेले सामने – ४

आशिया चषकामधील भारत वि. पाकिस्तान सामन्यांची आकडेवारी

एकूण सामने – १२
भारताने जिंकलेले सामने – ६
पाकिस्तानने जिंकलेले सामने – ५
अनिर्णित राहिलेले सामने – १

भारत वि. पाकिस्तानमध्ये दुबईतील मैदानात रंगलेल्या सामन्यांची आकडेवारी

एकूण सामने – २६
भारताने जिंकलेले सामने – ७
पाकिस्तानने जिंकलेले सामने – १९

भारताने सहा वेळा स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले असून पाकिस्तानने दोनच वेळा अशी कामगिरी केली आहे.