News Flash

Asia Cup 2018 : खलील अहमद ठरला वन-डेमध्ये पदार्पण करणारा ***वा भारतीय

भारताने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम संघात राजस्थानच्या खलिल अहमदला संधी दिली आहे.

खलील अहमद

Asia Cup 2018 : स्पर्धेत भारत आज आपला पहिला सामना खेळत आहे. पाकिस्तानविरुद्ध उद्या होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्याआधी आज भारताचा हाँगकाँगविरुद्ध सामना होत आहे. भारताचे साखळी सामन्यातील दोनही सामने हे सलग दोन दिवस असल्यामुळे भारताच्या कामगिरीकडे विशेष लक्ष आहे. त्यासाठी काही काळापासून भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज काहीसे त्रस्त दिसत असल्यामुळे साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये भारत आपल्या मधल्या फळीतील फलंदाजीकडे अधिक लक्ष देताना दिसेल यात शंका नाही. याशिवाय भारतीय संघाने आजच्या सामन्यात एका नवोदित खेळाडूला संधी दिली आहे.

भारताने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम संघात राजस्थानच्या खलिल अहमदला संधी दिली आहे. एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करणारा तो २२२वा खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेसाठी कर्णधार असलेल्या रोहित शर्माने त्याला कॅप देऊन संघात त्याचे स्वागत केले. याशिवाय अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांनाही संघात स्थान मिळाले आहे. मात्र हार्दिक पांड्याला संघातून वगळण्यात आले आहे.

कोण आहे खालील अहमद –

 • जयपूरपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या टोंक गावात खलिल अहमदचा जन्म झाला.
 • खलिलचे वडील हे कपांऊंडर म्हणून काम करत होते, खलिलने क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवण्यासाठी त्यांचा विरोध होता. मात्र
 • प्रशिक्षकांनी समजूत काढल्यानंतर खलिल क्रिकेट खेळायला लागला.
 • सुरुवातीच्या काळात खलिल टेनिस बॉलने सिमेंटच्या पिचवर सराव करायचा.
 • २०१६ साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात खलिलची भारतीय संघात निवड झाली होती. इशान किशनच्या नेतृत्वाखाली भारतीय
 • संघात खलिल खेळला होता. या स्पर्धेत खलिलने ६ सामन्यात ३ बळी मिळवले होते.
 • १९ वर्षाखालील भारतीय संघात खलिलला राहुल द्रविड यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
 • २०१७ साली टी-२० क्रिकेटमध्ये खलिलने राजस्थानकडून प्रथमश्रेणी सामन्यात पदार्पण केलं.
 • २०१८ च्या आयपीएल हंगामात सनराईजर्स हैदराबादने खलिलवर ३ कोटी रुपयांची बोली लावली होती.
 • भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खान हा आपला आदर्श असल्याचं खलिलने याआधीच मान्य केलं आहे.
 • मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खलिलने तेज-तर्रार मारा केला होता. या स्पर्धेत खलिल १४८ च्या वेगाने गोलंदाजी करत होता.
 • नुकत्याच बंगळुरुत पार पडलेल्या चौरंगी मालिकेत खलिल सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 6:00 pm

Web Title: asia cup 2018 khaleel ahmed becomes 222th player from team india in odi
Next Stories
1 Asia Cup 2018 IND vs HK LIVE : भारताचा हाँगकाँगवर रडतखडत विजय
2 आईला विचारुन आलायस ना? जेव्हा वासिम अक्रम लहानग्या सचिनची खिल्ली उडवतो…
3 China Open Badminton 2018 : सिंधू उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल, सायना नेहवालचं आव्हान संपुष्टात
Just Now!
X