Asia Cup 2018 IND vs HK : भारताने सलामीच्या लढतीत हाँगकाँगवर २६ धावांनी रडतखडत विजय मिळवला. सलामीवीर निझाकत खान (९२) आणि कर्णधार अंशुमन रथ (७३) यांनी १७४ धावांची सलामी भागीदारी करून भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पण हे दोघे बाद झाल्यानंतर हाँगकाँगच्या डावाला उतरती कळा लागली आणि भारताने सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खलील अहमदने आणि युझवेंद्र चहलने सर्वाधिक प्रत्येकी ३-३ बळी टिपले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या तुलनेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना रडवले. या दोघांनी १७४ धावांची सलामी भागीदारी केली. त्यामुळे एका क्षणी भारत हा सामना गमावतो की काय, अशी स्थिती होती. मात्र त्यानंतर हे दोघेही पाठोपाठ बाद झाले. निझाकत खानचे शतक ८ धावांनी हुकले. तो तिसऱ्यांदा नववंडीत बाद झाला. तर कर्णधार अंशुमन रथदेखील चुकीचा फटका खेळताना बाद झाला. त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला डाव सावरणे जमले नाही. ठराविक अंतराने बळी टिपण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. भारताकडून खलील अहमद आणि युझवेन्द्र चहल यांनी प्रत्येकी ३ तर कुलदीप यादवने २ बळी टिपले.

तत्पूर्वी, भारताने ५० षटकात ७ बाद २८५ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून शिखर धवन याने गब्बर खेळी करत शतक ठोकले. त्याने १२० चेंडूत १२७ धावा केल्या. या खेळीत त्याने १५ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. नाणेफेक जिंकून हाँगकाँग प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात (२३) बाद झाला. मात्र त्यानंतर धवन आणि रायडू या जोडीने चांगली भागीदारी केली. अर्धशतक साजरे केल्यानंतर रायडू ६० धावांवर बाद झाला. शिखर धवनने मोक्याच्या क्षणी शतक झळकावले. त्यानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यानंतर मात्र भारतीय संघाच्या डावाला गळती लागली. भारताने झटपट तीन बळी गमावले. धवन आणि धोनी बाद झाल्यांनतर पाठोपाठ दिनेश कार्तिकही बाद झाला. इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कम्गहिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला केवळ २८५ धावांपर्यंत मजल मारता आली. हाँगकाँगकडून किंचित शाहने सर्वाधिक ३, एहसान खानने २, तर एहसान नवाझ आणि एजाज खान यांनी १-१ बळी टिपला.

Live Blog

Highlights

  • 22:11 (IST)

    निझाकत खानचे अर्धशतक, हाँगकाँग बिनबाद ७६

    ?????? ?????????? ??????? ?????? ??? ???????? ?????? ??? ???? ???? ??????? ????? ????. ?????? ?????? ????? ? ????? ??? ? ????? ?????.

  • 20:48 (IST)

    धवनची 'गब्बर' खेळी, हाँगकाँगपुढे २८६ धावांचे आव्हान

    ??????????????????? ???????? ??????? ????????? ?? ????? ? ??? ??? ??????????? ??? ?????. ????????? ???? ??? ???? ????? ???? ??? ??? ?????. ?????? ??? ?????? ??? ???? ??????. ???????????? ?????? ????? ???????? ? ??? ?????.

  • 19:44 (IST)

    शिखर धवनचे दमदार शतक, भारताची द्विशतकी मजल

    ??????? ??????? ????? ???????? ??????? ???????? ???? ????? ????? ??? ???????? ????????? ??????? ????. ??????? ??????????????? ?????? ???????? ???????? ??? ???????. ????? ??? ???? ?????? ???? ??? ????? ????.

  • 18:29 (IST)

    धवनचे अर्धशतक, २०व्या षटकात भारताची शतकी मजल

    ??????? ??????? ????? ?????? ??????? ???? ? ??????? ???? ????? ????? ?????? ??????? ????? ?????? ????. ?????? ????????? ???????? ??????? ???????. ?? ????????? ?????? ? ????? ?????. ?????????? ????????? ?????? ????? ???? ??? ?????.

  • 16:42 (IST)

    नाणेफेक जिंकून हाँगकाँगचा गोलंदाजीचा निर्णय

    ????- ???????? ???????? ??????? ?????? ?????????? ?????????? ?????? ????? ???. ??????? ?? ??????? ????? ???, ?? ???????????? ?? ????? '??? ?? ???'?? ???.

00:41 (IST)19 Sep 2018
किंचित शाहपाठोपाठ एजाज खान माघारी, हाँगकाँगचे सहा गडी बाद

किंचित शाह बाद झाल्यानंतर एजाज खानदेखील बाद झाला. पहिल्याच चेंडूवर चहलने त्याला तंबूत धाडले.

00:37 (IST)19 Sep 2018
हाँगकाँगचा पाचवा गडी बाद, किंचित शाह माघारी

गोलंदाजीत आपली छाप पाडणारा किंचित शाह फलंदाजीत मात्र चांगला खेळ करू शकला नाही. १५ चेंडूत १७ धावा करून तो बाद झाला.

00:18 (IST)19 Sep 2018
अनुभवी बाबर हयात बाद, चहलला पहिले यश

अनुभवी बाबर हयात बाद, चहलला पहिले यश

00:10 (IST)19 Sep 2018
हाँगकाँगचा तिसरा गडी बाद, कार्टर झेलबाद

क्रिस्तोपर कार्टरच्या रूपाने हाँगकाँगने तिसरा गडी गमावला. खलील अहमदने आपला दुसरा बाली टिपला. यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीने सहजपणे हा झेल टिपला. कार्टरने केवळ ३ धावा केल्या.

23:53 (IST)18 Sep 2018
निझाकत खान ९२ धावांवर बाद, खलीलने टिपला पहिला आंतरराष्ट्रीय बळी

१७४ धावांच्या भागीदारीनंतर अखेर भारताला पहिला बळी मिळाला. त्यापाठोपाठच नवोदित खलील अहमदने भारताला आणखी एक दिलासा दिला. त्याने ९२ धावनावर खेळत असलेल्या निझाकत खानला तंबूत धाडले. त्याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपला बळी मिळवला.

23:49 (IST)18 Sep 2018
कर्णधार अंशुमन रथ बाद, भारताला अखेर मिळाला पहिला बळी

अखेर भारताला पहिले यश मिळाले. कुलदीप यादवने कर्णधार अंशुमन रथला बाद केले. त्याने ७३ धाव करून ४ चौकार आणि १ षटकार खेचला. निझाकत खानच्या साथीने अंशुमनने पहिल्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी केली.

23:23 (IST)18 Sep 2018
कर्णधार अंशुमन रथचे संयमी अर्धशतक

हाँगकाँगचा कर्णधार अंशुमन रथ याने भारताच्या गोलंदाजांच्या माऱ्याला न जुमानता अतिशय संयमी खेळी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. तो आता ८३ चेंडूत ५७ धावांवर खेळत आहे. तर हाँगकाँगनेही दीडशतकी मजल मारली असून भारताला अद्याप एकही बळी मिळवता आलेला नाही.

22:41 (IST)18 Sep 2018
हाँगकाँगची शतकी सलामी, भारतीय गोलंदाज हैराण

हाँगकाँगचे सलामीवीर निझाकत खान आणि कर्णधार अंशुमन रथ यांनी भारतीय गोलंदाजांचे कंबरडे मोडले. भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, युझव्हेंडर चहल अशा गोलंदाजाच्या फौजेपुढे शरण न येता हाँगकाँगच्या सलामीवीरांनी भक्कम सुरुवात केली.

22:11 (IST)18 Sep 2018
निझाकत खानचे अर्धशतक, हाँगकाँग बिनबाद ७६

भारतीय गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत सलामीवीर निझाकत खान याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार खेचले.

22:00 (IST)18 Sep 2018
हाँगकाँगची धडाकेबाज सुरुवात, दहाव्या षटकात अर्धशतकी सलामी

भारतापुढे तुलनेने कमकुवत वाटणाऱ्या हाँगकाँगच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली आहे. डावाची सुरुवात चौकाराने केलेल्या हाँगकाँगने दहाव्या षटकात ५० धावांचा टप्पा गाठला असून भारताला एकही गडी बाद करता आलेला नाही.

20:48 (IST)18 Sep 2018
धवनची 'गब्बर' खेळी, हाँगकाँगपुढे २८६ धावांचे आव्हान

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताने निर्धारित ५० षटकात ७ बाद २८५ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून शिखर धवन याने गब्बर खेळी करत शतक ठोकले. त्याने १२० चेंडूत १२७ धावा केल्या. हाँगकाँगकडून किंचित शाहने सर्वाधिक ३ बळी टिपले.

20:43 (IST)18 Sep 2018
शार्दूल ठाकूर शून्यावर बाद, भारताला सातवा धक्का

शार्दूल ठाकूर शून्यावर बाद झाला. शेवटचे षटक सुरु असल्यामुळे धावा जमवण्याच्या प्रयत्नात त्याने मोठा फटका खेळला. पण त्यावर त्याला धाव मिळवता आली नाही. एजाज खानच्या चेंडूवर कार्टरने त्याचा झेल टिपला.

20:38 (IST)18 Sep 2018
भारताचा सहावा गडी तंबूत, भुवनेश्वर कुमार बाद

भुवनेश्वर कुमारच्या रूपात भारताने सहावा गडी गमावला. त्याने १८ चेंडूत ९ धावा केल्या. किंचित शाहच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. कर्णधार अंशुमन रथ याने त्याचा झेल टिपला.

20:15 (IST)18 Sep 2018
भारताच्या डावाला गळती; धवन, धोनीपाठोपाठ कार्तिक बाद

भारतीय संघाच्या डावाला गळती लागली. भारताने झटपट तीन बळी गमावले. धवन आणि धोनी बाद झाल्यांनतर पाठोपाठ दिनेश कार्तिकही बाद झाला. चांगली सुरुवात मिळून देखील मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. त्याने ३३ धावा केल्या.

20:09 (IST)18 Sep 2018
महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद, हाँगकाँगला मोठा दिलासा

आशिया चषक स्पर्धेत २००८ साली हाँगकाँगविरुद्ध शतक झळकावलेल्या महेंद्रसिंग धोनीला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. एहसान खान याच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाने त्याला झेलबाद केला. धोनी केवळ ३ चेंडूत शून्यावर बाद झाला. त्यामुळे हाँगकाँगच्या संघाला मोठा दिलासा मिळाला.

20:04 (IST)18 Sep 2018
शतकवीर धवन बाद, भारताचा तिसरा गडी माघारी

भारताचा सलामीवीर शिखर धवन याने मोक्याच्या क्षणी शतक झळकावले. त्यानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने १२७ धावा केल्या. या खेळीत त्याने १५ चौकार आणि २ षटकार खेचले.

19:44 (IST)18 Sep 2018
शिखर धवनचे दमदार शतक, भारताची द्विशतकी मजल

इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवनने आशिया चषक स्पर्धेत सकारात्मक सुरूवात केली. दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. एकेरी धाव काढत त्याने आपले शतक साजरे केले.

19:14 (IST)18 Sep 2018
तडाखेबाज अर्धशतकानंतर रायडू माघारी, भारताला दुसरा धक्का

३ चौकार आणि १ षटकार लगावत आपले अर्धशतक साजरे करणारा रायडू लगेच बाद झाला. त्याने ६० धावा केल्या. फिरकीपटूच्या गोलंदाजीवर उसळत्या चेंडूवर तो बाद झाला. यष्टिरक्षकाने अत्यंत उत्तम झेल पकडत रायडूला तंबूचा रस्ता दाखवला.

19:09 (IST)18 Sep 2018
रायडूचे तडाखेबाज अर्धशतक, भारताचेही दीडशतक

दीर्घ काळानंतर भारतीय संघात स्थान मिळलेल्या अंबाती रायडूने संधीचे सोने केले. त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावत आपले अर्धशतक ठोकले. त्याच्या अर्धशतकाबरोबरच भारतानेही आपले दीडशतक गाठले.

18:29 (IST)18 Sep 2018
धवनचे अर्धशतक, २०व्या षटकात भारताची शतकी मजल

इंग्लंड दौऱ्यात फारशी चांगली कामगिरी करता न आलेल्या शिखर धवनने आशिया चषकाची सुरुवात मात्र चांगली केली. त्याने सलामीच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. या अर्धशतकात त्याने ८ चौकार खेचले. त्याबरोबरच भारतानेही २०व्या षटकात शतकी मजल मारली.

17:38 (IST)18 Sep 2018
भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा २३ धावांवर बाद

एकदिवसीय फॉरमॅटमध्ये तीन द्विशतक नावावर असलेल्या भारताच्या कर्णधाराला हाँगकाँगविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा २३ धावांवर बाद झाला. उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याचा निझाकत खानने झेल टिपला. एहसान खानने त्याला बाद केले.

16:58 (IST)18 Sep 2018
प्रथम गोलंदाजी करणारा हाँगकाँगचा संघ

अंशुमन रथ (कर्णधार), ऐझाझ खान, बाबर हयात, कॅमेरून मॅक्युल्सन, ख्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाझ, किनचिट शाह, नदीम अहमद, स्कॉट मॅककेहनी, तन्वीर अफझल.

16:50 (IST)18 Sep 2018
भारताच्या संघात खलील अहमदला संधी

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद.

16:42 (IST)18 Sep 2018
नाणेफेक जिंकून हाँगकाँगचा गोलंदाजीचा निर्णय

भारत- हाँगकाँग सामन्यात नाणेफेक जिंकून हाँगकाँगने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचा हा सलामीचा सामना आहे, तर हाँगकाँगसाठी हा सामना 'करो या मरो'चा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2018 schedule live updates score and result matches india vs hongkong odi
First published on: 18-09-2018 at 16:34 IST