Asia Cup 2018 IND vs HK : हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताने निर्धारित ५० षटकात ७ बाद २८५ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून शिखर धवन याने गब्बर खेळी करत शतक ठोकले. त्याने १२० चेंडूत १२७ धावा केल्या. या खेळीत त्याने १५ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी केली. अंबाती रायडूनेही आपली निवड सार्थ ठरवत अर्धशतक झळकावले. हाँगकाँगकडून किंचित शाहने सर्वाधिक ३ बळी टिपले.

नाणेफेक जिंकून हाँगकाँग प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात (२३) बाद झाला. मात्र त्यानंतर धवन आणि रायडू या जोडीने चांगली भागीदारी केली. अर्धशतक साजरे केल्यानंतर रायडू ६० धावांवर बाद झाला. शिखर धवनने मोक्याच्या क्षणी शतक झळकावले. त्यानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने १२७ धावा केल्या. या खेळीत त्याने १५ चौकार आणि २ षटकार खेचले. मात्र नंतर भारतीय संघाच्या डावाला गळती लागली. भारताने झटपट तीन बळी गमावले. धवन आणि धोनी बाद झाल्यांनतर पाठोपाठ दिनेश कार्तिकही बाद झाला. इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कम्गहिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला केवळ २८५ धावांपर्यंत मजल मारता आली. हाँगकाँगकडून किंचित शाहने सर्वाधिक ३, एहसान खानने २, तर एहसान नवाझ आणि एजाज खान यांनी १-१ बळी टिपला.