News Flash

Asia Cup 2018 : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ‘गब्बर’चा अनोखा विक्रम, दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान

शिखरची फलंदाजीतही कमाल

शिखर धवन (संग्रहीत छायाचित्र)

दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकात, Super 4 गटातील पहिल्या सामन्यात भारताच्या शिखर धवनने अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पंक्तीत शिखर धवनला स्थान मिळालं आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात शिखरने ४ झेल घेतले. नझमुल हुसेन, शाकिब अल हसन, मेहदी हसन, मुस्तफिजूर रेहमान या ४ खेळाडूंचे झेल शिखर धवनने क्षेत्ररक्षणादरम्यान पकडले.

शिखर धवन व्यतिरीक्त असा विक्रम करणारे भारतीय खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत –

  • सुनिल गावसकर – विरुद्ध पाकिस्तान (शारजा १९८५)
  • मोहम्मद अझरुद्दीन – विरुद्ध पाकिस्तान (टोरांटो १९९७)
  • सचिन तेंडुलकर – विरुद्ध पाकिस्तान (ढाका १९९९८)
  • राहुल द्रविड – विरुद्ध वेस्ट इंडिज (टोरांटो १९९९)
  • मोहम्मद कैफ – विरुद्ध श्रीलंका (जोहान्सबर्ग २००३)
  • व्ही. व्ही. एस. लक्ष्मण – विरुद्ध झिम्बाब्वे (पर्थ २००४)

नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात शिखर धवनला चांगली कामगिरी करता आली नव्हती, मात्र याची सर्व कसर शिखरने आशिया चषकात भरुन काढली आहे. एका शतकासह शिखर आतापर्यंत आशिया चषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. बांगलादेशवर मात केल्यानंतर भारताची आज पुन्हा एकदा पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात शिखर धवन आणि भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 1:59 pm

Web Title: asia cup 2018 shikhar dhawan joins sachin tendulkar rahul dravid in unique odi record
Next Stories
1 आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता
2 कुस्तीमधील भीष्माचार्य
3 हॉकीतले रत्नपारखी!
Just Now!
X