आशिया चषकात पाकिस्तानी संघाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. Super 4 गटाच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानवर मात करुन अंतिम फेरी गाठली. मात्र पाकिस्तानच्या संघाला प्रत्येक सामन्यात पाठींबा देण्यासाठी मैदानात हजर असलेले बशीर चाचा हे अंतिम सामना पाहण्यासाठी दुबईच्या मैदानात हजर होते. महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी बशीर चाचांनी टीम इंडियाची निळी जर्सी घालून भारताला आपला पाठींबा दर्शवला.
— Kabali of Cricket (@KabaliOf) September 28, 2018
बशीर चाचा हे सध्या दुबईत भारतीय संघ राहत असलेल्या हॉटेलमध्येच वास्तव्यास आहेत. मध्यंतरी त्यांनी धोनीसोबत फोटो काढून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकले होते. याचसोबत भारतीय संघासोबत प्रत्येक सामन्यात फिरणारा सुधीर गौतमलाही बशीर चाचांनी आर्थिक मदत केली होती. Super 4 गटाच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानवर ३७ धावांनी मात करुन अंतिम फेरी गाठली होती.
अवश्य वाचा – Asia Cup 2018 Final : महेंद्रसिंह धोनीचा आणखी एक विक्रम, दिग्गज यष्टीरक्षकांच्या पंक्तीत मिळवलं स्थान
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 29, 2018 3:21 am