बांगलादेशात सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात जपानवर ५-१ तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर ७-० अशी मात करत भारताने या स्पर्धेत विजेतेपदासाठी आपला दावा भक्कम केला आहे. यानंतर साखळी सामन्यात भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. पाकिस्ताननेही आपल्या साखळी सामन्यात बांगलादेशवर ७-० अशी मात करत चांगली सुरुवात केली होती. मात्र जपानने पाकिस्तानला २-२ अशा बरोबरीत रोखलं होतं.

आशिया चषकात या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांचा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. दोन विजयांसह भारताने पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला असला तरीही, पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत आपलं पहिलं स्थान आणखी भक्कम करण्याचा जोर्द मरीन यांच्या भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

कधी रंगेल भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना?
१५ ऑक्टोबर म्हणजेच रविवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा सामना रंगणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची वेळ काय असेल?
संध्याकाळी ५ वाजता दोन्ही संघांमधला सामना सुरु होईल.

या सामन्याचं प्रक्षेपण कोणत्या वाहिनीवर होईल?
स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स एचडी २ या वाहिन्यांवर भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी सामन्याचं थेट प्रक्षेपण होणार आहे.

या सामन्यात लाईव्ह स्ट्रिमींग कोणत्या मोबाईल अॅपवर असेल?
हॉटस्टार या मोबाईल अॅपवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमींग होतं. याव्यतिरीक्त लोकसत्ता.कॉमवरही तुम्ही सामन्याची बातमी व विश्लेषण वाचू शकता.