भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारतीय महिलांनी उपांत्य सामन्यात गतविजेत्या जपानला ४-२ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भारतीय महिलांसमोर चीनचे आव्हान असणार आहे.
उपांत्य फेरीत कझाकिस्तानविरुद्ध गोलची हॅटट्रिक करणाऱ्या ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने सामन्याच्या सातव्या आणि नवव्या मिनिटाला भारताकडून दोन गोल नोंदवले. त्यानंतर काही क्षणातच कौरने तिसरा गोल नोंदवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याच्या मध्यातंरानंतर जपानने दोन गोल करत भारतीय संघाची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय महिलांनी प्रतिस्पर्धी महिलांना रोखण्यात यश मिळवले. सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला लालरेमसियमने भारताकडून चौथा गोल नोंदवत भारताला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कायम राखत भारताने जपानला पराभवाचा धक्का दिला.

यापूर्वी ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने महिला आशिया चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली होती. यावेळी भारतीय महिलांनी कझाकस्तानचा ७-१ असा धुव्वा उडवला होता. या सामन्यातील विजय फॉर्म कायम राखत जापानविरुद्धच्या सामन्यात भारताने ४-२ असा विजय मिळवला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup hockey indian women beat defending champions japan 4 2 to make final
First published on: 03-11-2017 at 17:51 IST