News Flash

आशिया चषकाचं आयोजन रद्द, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती

आशियाई क्रिकेट परिषद किंवा पाक क्रिकेट बोर्डाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण नाही

करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका आणखी एका स्पर्धेला बसला आहे. यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली Sports Tak च्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलत असताना याबद्दल माहिती दिली. आशियाई क्रिकेट परिषद किंवा स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क असलेल्या पाक क्रिकेट बोर्डाने अद्याप याबद्दल अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.

“एशिया कप कॅन्सल हो चुका है, जो सप्टेंबर मे था…” सौरव गांगुलीने इन्स्टा लाईव्ह सेशनमध्ये माहिती दिली. आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्यासाठी बीसीसीआयने पाक क्रिकेट बोर्डाला PSL चं आयोजन पुढे ढकलून त्या जागेवर आशिया चषक खेळवण्याची विनंती केली होती, ज्याला पाक क्रिकेट बोर्डाने नकार दिला होता. ४ हजार कोटींचं नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अंतिम निर्णय घेण्याची वाट बीसीसीआय पाहत आहे.

भारतीय संघ मैदानात कधी पुनरागमन करणार याबद्दल ठोस माहिती देण्यास गांगुलीने नकार दिला. “भारत आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळेल हे सांगणं जरा कठीण आहे. आम्ही सर्व तयारी केली आहे, पण जोपर्यंत सरकार नियम स्पष्ट करत नाही तोपर्यंत काहीही बोलणं योग्य ठरणार नाही. प्रत्येक खेळाडूची तब्येत महत्वाची असल्यामुळे आम्हाला सध्या कोणतीही घाई नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 9:43 pm

Web Title: asia cup is cancelled says sourav ganguly psd 91
Next Stories
1 धोनीच्या निवृत्तीवर महत्त्वाची अपडेट; मॅनेजरने दिली माहिती
2 देशासाठी लढणाऱ्या करोनायोद्ध्यांचा क्रिकेटच्या मैदानात आगळावेगळा सन्मान
3 Eng vs WI : पुनरागमनावरच पाणी ! पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया
Just Now!
X