12 July 2020

News Flash

आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताला कांस्यपदक

भारताचे या स्पर्धेतील हे २०१६नंतरचे दुसरे कांस्यपदक ठरले.

(संग्रहित छायाचित्र)

इंडोनेशियाकडून पराभूत; लक्ष्यचा आशियाई विजेत्या जोनाटनवर धक्कादायक विजय

लक्ष्य सेनने आशियाई विजेत्या जोनाटन ख्रिस्तीवर धक्कादायक मात केल्यानंतरही भारताला आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत इंडोनेशियाकडून २-३ पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताला स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे या स्पर्धेतील हे २०१६नंतरचे दुसरे कांस्यपदक ठरले.

जागतिक क्रमवारीत ३१व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने सातव्या क्रमवारीवरील जोनाटनला २१-१८, २२-२० असे नमवत दमदार विजय नोंदवून दिला. त्याआधीच्या एकेरीत अ‍ॅँथनी गिंटिंगकडून ६-२१ पिछाडीवर असलेल्या बी. साईप्रणितने सामना अर्धवट सोडला. एकेरीत शुभांकर डे याने २०व्या क्रमवारीवरील शेसार रुस्ताविटोला २१-१७, २१-१५ नमवले. मात्र  चिराग शेट्टी आणि लक्ष्य सेन या जोडीचा दुहेरीत पराभव झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 1:56 am

Web Title: asia team badminton tournament bronze medal for india abn 97
Next Stories
1 डाव मांडियेला : ब्रिजची परिभाषा
2 दोन याद्या, दोन पत्रे.. कोणती ग्राह्य ?
3 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबई विजयापासून वंचित!
Just Now!
X