06 December 2019

News Flash

अन्नू, पारुलकडून भारताला दोन पदके

द्युती चंदने १०० मीटर शर्यतीची राष्ट्रीय विक्रमासह उपांत्य फेरी गाठली.

भालाफेकपटू अन्नू राणी आणि ५००० मीटरची धावपटू पारुल चौधरी यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावत आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले. द्युती चंदने १०० मीटर शर्यतीची राष्ट्रीय विक्रमासह उपांत्य फेरी गाठली.

अन्नूने तिच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा सुमारे दोन मीटर कमी कामगिरीची नोंद करताना ६०.२२ मीटर भालाफेक केली, तर चीनच्या लू हुईहुईने सुवर्णपदक मिळवताना तब्बल ६५.८३ मीटर भालाफेक केली. भारताला दुसरे पदक ५००० मीटर शर्यतीत पारुलने मिळवून दिले. पारुलने आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना १५ मिनिटे ३६ सेकंद ०३ शतांश सेकंद अशी वेळ दिली, तर चौथ्या आलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधवने १५ मिनिटे ४१ सेकंद १२ शतांश सेकंद अशी वेळ नोंदवली. या गटात बहारिनच्या मुटिले विनफ्रेड यावी आणि बोंटू रेबिटू यांनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले.

द्युतीने महिलांच्या १०० मीटर शर्यतीमध्ये स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडत आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. २३ वर्षीय द्युतीने ११.२८ सेकंदांची वेळ देत १०० मीटरची चौथी शर्यत जिंकली. गुवाहाटी येथे गेल्या वर्षी प्रस्थापित केलेला ११.२९ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम तिने मोडला.

मात्र जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आवश्यक असलेली ११.२४ सेकंदांची वेळ तिला गाठता आली नाही. ४०० मीटर शर्यतीच्या पात्रता फेरीत भारताची एम.आर.पूवम्मा हिने दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली. बहारिनच्या सालवा नासेरने पहिला क्रमांक मिळवला. परंतु हिमाला ऐन स्पर्धेतच पाठदुखीचा त्रास वाटू लागल्याने तिला शर्यत पूर्ण करता आली नाही.

First Published on April 22, 2019 1:42 am

Web Title: asian athletics championships
Just Now!
X