भारताचे बॉक्सर अमित पंघल आणि पुजा राणी यांनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अमितने ५२ किलो वजनी गटात कोरियाच्या किम इंक्यूवर मात केली. तर महिलांमध्ये पुजा राणीने ८१ किलो वजनी गटात वँग लिनावर मात केली.

४९ किलो वजनी गटातून ५२ किलो वजनी गटात सामने खेळायला लागल्यानंतर अमितचं या स्पर्धेतल सलग दुसऱ्या वर्षातलं सुवर्णपदक ठरलं आहे. अमितने सामन्यात सुरुवातीपासून आपलं वर्चस्व कायम राखलं. आक्रमण आणि बचाव या जोरावर अमितने आपल्या प्रतिस्पर्ध्याला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही.

अवश्य वाचा – ISSF World Cup : १७ वर्षीय दिव्यांशने कमावला ऑलिम्पिक कोटा, रौप्यपदकाची कमाई

सामना संपल्यानंतर अमितने आपल्या खेळाबद्दल समाधान व्यक्त केलं. “मी ज्या पद्धतीने रणनिती आखली होती, त्याप्रमाणे खेळ केला आणि सामना जिंकलो. मी आनंदात आहे.” अमितने केलेला खेळ हा सर्वोत्तम होता अशा शब्दात त्याच्या प्रशिक्षकांनीही त्याचं कौतुक केलं. ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.