आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने जपानवर ३-२ ने मात केली आहे. या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. विजयाची परंपरा अखंडपणे ठेवत उपांत्य सामन्यात भारताने आशियायी खेळ सुवर्णपदक विजेत्या जपानवर वर्चस्व गाजवले.

उपांत्य सामन्यात भारताकडून गुरजंतने १९ व्या मिनीटाला चिंगलेनसानाने ४४ व्या आणि दिलप्रीतने ५५ व्या मनिटाला भारताकडून प्रत्येकी एक एक गोल केला. प्रतुत्तरदाखल जपानला दोन गोल करता आले. जपानकडून हिरोताका वाकुरीने २२ व्या आआणि हिरोताका जेनदानाने ५६ व्या मिनीटाला प्रत्येकी एक एक गोल केले. पण ते आपला पराभव रोखू शकले नाहीत.

या सामन्यात चार पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, मात्र भारताला फक्त एकाच पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेता आला. जपानच्या संघाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. त्यामधील दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांचा महमुकाबला होणार आहे. तर ओमनचा पराभ करत कोरियाने पाचव्या स्थानावर कब्जा केला आहे.

भुवनेश्वर येथे होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेआधीची ही अखेरची स्पर्धा असल्यामुळे टीकाकारांना चोख उत्तर देण्यासाठी तसेच आत्मविश्वास उंचावण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर गतविजेत्यांनी आतापर्यंत पूर्णपणे हुकमत गाजवली आहे.