लॉकडाउनपश्चात भारतीय हॉकी संघ आपली पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२१ साली बांगलादेशातील ढाका येथे खेळवण्यात येणार असलेल्या Asian Champions Trophy साठी भारतीय हॉकी संघ मैदानात उतरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध FIH Pro League चे सामने खेळल्यानंतर भारतीय हॉकीसंघ एकही सामना खेळलेला नाही.

११ मार्चरोजी भारतीय संघ जपानसोबत आपला पहिला सामना खेळेल. यानंतर १२ तारखेला बांगलादेश तर १३ तारखेला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भारतीय संघ दोन हात करेल. असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक –

  • ११ मार्च – जपान विरुद्ध भारत
  • १२ मार्च – बांगलादेश विरुद्ध भारत
  • १३ मार्च – भारत विरुद्ध पाकिस्तान
  • १५ मार्च – मलेशिया विरुद्ध भारत
  • १६ मार्च – भारत विरुद्ध दक्षिण कोरिया

१८ मार्चला या स्पर्धेचे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार असून १९ मार्चला संध्याकाळी आठ वाजता स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.