News Flash

आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने नवी मुंबईत

अहमदाबाद आणि भुवनेश्वरचीही निवड

(संग्रहित छायाचित्र)

भारतात २०२२ मध्ये होणाऱ्या महिलांच्या ‘एएफसी’ आशियाई चषक फु टबॉल स्पर्धेतील सामने नवी मुंबई, अहमदाबाद आणि भुवनेश्वर येथे होणार आहेत.

पुढील वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेतील सामने नवी मुंंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, अहमदाबादचे ट्रान्स्टॅडिया आणि भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर होतील. या स्पर्धेसाठीचे पात्रता सामने १३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणार असून, त्याची कार्यक्रम पत्रिका २७ मे या दिवशी आशियाई फुटबॉल महासंघाच्या मुख्यालयात जाहीर होतील.

‘‘आशियातील महिला फु टबॉल हे जागतिक दर्जाचे असून, अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि संयोजन समितीने या  ठिकाणांची निश्चिती केली आहे,’’ अशी माहिती आशियाई फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस डॅटो विंडसर जॉन यांनी दिली.

‘‘२०२२च्या नव्या वर्षात महिलांच्या ‘एएफसी’ आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अहमदाबाद, भुवनेश्वर आणि नवी  मुंबईतील स्टेडियममध्ये या दृष्टीने सुधारणा करण्यात येणार आहे. २०१७च्या कु मार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नवी मुंबईत उत्तम प्रतिसाद लाभला होता,’’ अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफु ल्ल पटेल यांनी दिली.

याशिवाय २०२२ मध्ये १७ वर्षांखालील गटाची कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धासुद्धा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:18 am

Web Title: asian cup football matches in navi mumbai abn 97
Next Stories
1 तेजस्विनी-संजीव यांना सुवर्णपदक
2 सायना उपांत्य फेरीत
3 ग्रँडमास्टर लेऑन मेंडोसाला जेतेपद
Just Now!
X