News Flash

बॉक्सिंगमध्ये भारतीय महिलांकडून निराशा; मेरी कोमकडून सुवर्णपदकाच्या आशा कायम

आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारचा दिवस भारतीय महिला बॉक्सर्सच्या दृष्टीने निराशाजनक ठरला. मात्र, मेरी कोमने अंतिम फेरीत धडक मारल्याने भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा अजूनही कायम आहेत.

| September 30, 2014 12:27 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारचा दिवस भारतीय महिला बॉक्सर्सच्या दृष्टीने निराशाजनक ठरला. मात्र, मेरी कोमने अंतिम फेरीत धडक मारल्याने भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा अजूनही कायम आहेत. ५७ ते ६० किलो वजनी गटात भारताच्या सरितादेवीला पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीच्या या सामन्यात सरिताला कोरियाच्या पार्क जीनाकडून पराभव स्विकारावा लागला. मात्र, यासाठी पंचांनी दिलेले सदोष निकाल कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या लढतीनंतर ट्विटरवर सामन्यातील पंचांविरूद्ध टीकेचा पाऊस पडताना दिसला.

तर दुसरीकडे ६९ ते ७५ या मध्यम वजनी गटातही भारताच्या पुजा राणीला चीनच्या क्युआन लीकडून पराभव स्विकारावा लागल्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, ४८ ते ५१ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या मेरी कोमने व्हिएतनामच्या थी बँगचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे आता मेरी कोम सुवर्णपदक मिळवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 12:27 pm

Web Title: asian games 2014 day 11 live mary kom punches her way into gold medal round sarita devi settles for bronze
टॅग : Mary Kom,Sarita Devi
Next Stories
1 बारा वर्षांनंतर भारतीय हॉकी संघ अंतिम फेरीत
2 टेनिस :सानिया-साकेतला सुवर्ण
3 अ‍ॅथलेटिक्स : सीमाची सोनेरी कामगिरी
Just Now!
X