News Flash

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची सुवर्ण कामगिरी

इन्चॉन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे.

| September 27, 2014 12:25 pm

इन्चॉन येथे सुरू असलेल्या  आशियाई  क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. रजत चौहान, संदीप कुमार आणि अभिषेक वर्मा यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने सुवर्णपदकावर नाव कोरले. भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा २२७-२२४ असा पराभव केला.
भारतीय तिरंदाजांनी मोठ्या स्पर्धांमध्ये मिळविलेले हे पहिले सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी नेमबाज जितु राय याने सुवर्णपदक मिळविले होते. महिलांनीही तिरंदाजीत ब्राँझपदक मिळविले. तृषा देव, पुर्वशा शेंडे आणि सुरेखा ज्योती या भारतीय महिला तिरंदाजी संघातील खेळाडूंनी इराणचा २१७-२२४ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 12:25 pm

Web Title: asian games 2014 indian men win gold in team compound archery women win bronze
टॅग : Asian Games
Next Stories
1 भारतीय नेमबाजांना रौप्य
2 बॅडमिंटन: भारताचे आव्हान संपुष्टात
3 रवी शास्त्री यांना संचालकपदी मुदतवाढ
Just Now!
X