आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बुधवारी जपानचा २-१ असा पराभव करत कांस्य पदक पटकावले. भारतीय महिला हॉकी संघाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे तिसरे कांस्य पदक आहे.
जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानी असलेल्या भारतीय संघाचा चार वर्षांपूर्वी चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत दहाव्या स्थानी असेलेल्या जपानने ०-१ असा पराभव केला होता, त्या पराभवाचा वचपा बुधवारी भारताने काढला.
भारताच्या जसप्रीत कौर (२३ व्या मिनिटाला) आणि वंदना कटारिया (४२ व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी प्रत्येकी एक गोल झळकावला. तर जपानच्या अकेन शिबाताने (४१ व्या मिनिटाला) गोल केला.