आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी नेमबाजांनी भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचं काम केलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या १६ वर्ष वयाच्या सौरभने केलेल्या या सुवर्ण कामगिरीमुळे अनेकांना सुखद धक्का बसला. सौरभने सुवर्ण पदक जिंकताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. यामध्ये अगदी नेत्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वाचाच समावेश होता. म्हणूनच Saurabh Chaudhary हे नाव लगेचच ट्विटवर टॉप ट्रेण्डींगमध्ये दिसत होते. पाहुयात सौरभच्या या कामगिरीबद्दल कोण काय म्हणाले आहे.

राजनाथ सिंह

क्रिडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोर

विरेंद्र सेहवाग

काँग्रेस पक्षाकडूनही अभिनंदन

मेजर सुरेंद्र पुनिया

डॉ. हर्ष वर्धन

बाबुल सुप्रियो

भाजप युथ विंग

डॉ. सत्यपाल सिंह

अनिल शिरोळे

अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळालं आहे. पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान पटकावलं होतं. अंतिम फेरीतही सौरभ आणि अभिषेक यांनी मातब्बर खेळाडूंची झुंज मोडून काढत पदकांच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं.