भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री हिची आशियाई खेळांसाठी भारतीय बॅडमिंटन संघात निवड करण्यात आलेली आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेने आशियाई खेळांसाठी भारताच्या २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता शहरात आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुरुष संघाचं नेतृत्व किदम्बी श्रीकांत तर महिला संघाचं नेतृत्व सायना नेहवाल करणार आहे.

आशियाई खेळांसाठी असा असेल भारताचा बॅडमिंटन संघ –

पुरुष संघ – किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साई प्रणीत, समीर वर्मा, सौरभ वर्मा, सत्विकसाईराज रणकिरेड्डी, चिराग शेट्टी, मनु अत्री, बी. सुमीत रेड्डी, प्रणव जेरी चोप्रा

महिला संघ – पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, एन. सिकी रेड्डी, आश्विनी पोनाप्पा, साई उत्तेजिता राव, अश्मिता चलिहा, ऋतुपर्णा पांडा, आरती सारा सुनील, आकर्षी कश्यप, गायत्री गोपीचंद