Asian Games 2018 : इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज स्पर्धेच्या आठव्या दिवशी ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या हिमा दासने रौप्यपदकाची कमाई केली. तिने ५०. ७९ सेकंदात शर्यत पार केली. तर दुसरीकडे ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासनेही रौप्यपदकाची कमाई केली. अनासने ४५.४९ सेकंदात शर्यत पार केली. या बरोबर भारताने आतापर्यंत दिवसात ५ रौप्यपदकांची कमाई केली आहे. द्युतीचंदला २ सेकंदाच्या फरकाने सुवर्णपदकाला मुकावे लागले.

या आधी भारताने ‘इक्वेस्ट्रीयन’ या घोडेस्वारीच्या प्रकारात दोन रौप्यपदके पटकावली. घोडेस्वार फौवादचे मिर्झा याला वैयक्तिक प्रकारात हे यश संपादन केले. भारताला ३६ वर्षांनंतर ‘इक्वेस्ट्रीयन’ प्रकारात वैयक्तिक रौप्यपदक मिळाले. याशिवाय सांघिक प्रकारातही भारताने ‘इक्वेस्ट्रीयन जम्पिंग’मध्येही रौप्यपदक मिळवले.

Romario Shephard Hits 32 Runs in 20th Over MI vs DC IPL 2024
IPL 2024: ४,६,६,६,४,६ रोमारियो शेफर्डची वानखेडेवर वादळी खेळी, २० व्या षटकात कुटल्या विक्रमी ३२ धावा
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
India Australia first Test match likely to be held in Perth sport news
भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पर्थला?
african cheetah gamini gave birth to six cubs in kuno park
आफ्रिकन चिता ‘गामिनी’चा भारतात विश्वविक्रमच! पाच नाही तर सहा बछड्यांना दिला जन्म

त्यानंतर भारताच्या सायना नेहवालने थायलंडच्या रात्चनोक इंटानोन हिच्यावर २१-१८, २१-१६ अशी मात केली. त्यामुळे सायना पदकाच्या शर्यतीत दाखल असून भारताचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे. सायनापाठोपाठ भारताच्या सिंधूने थायलंडच्या जिंदापॉलवर २१-११, १६-२१, २१-१४ अशी मात केली. त्यामुळे सिंधूही पदकाच्या शर्यतीत दाखल झाली असून भारताला २ पदकांची कमाई करता येऊ शकते. यामुळे या स्पर्धेच्या बॅडमिंटन क्रिडाप्रकारातील ३६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपणार आहे. तसेच, भारतीय नेमबाजांचीही पदके निश्चित आहेत. श्रीशंकरदेखील लांबउडी प्रकारातील अंतिम फेरीत सहभागी होणार आहे.

Live Blog

19:52 (IST)26 Aug 2018
१०० मीटर धावणे

द्युतीचंदला ०. ०२ सेकंदाच्या फरकाने सुवर्णपदकाला मुकावे लागले. तिने रौप्य पदक पटकावले

19:21 (IST)26 Aug 2018
१० हजार मीटर धावणे - भारताने पदक गमावलं

पाऊल बाहेर पडल्यामुळे लक्ष्मणं गोविंदमने गमावलं कांस्यपदक

18:31 (IST)26 Aug 2018
हॉकी पुरुष

भारताची दक्षिण कोरियावर ५-३ अशी मात. मंगळवारी श्रीलंकेशी साखळी फेरीतील अंतिम सामना

18:29 (IST)26 Aug 2018
ब्रीज

भारताला ब्रिज प्रकारात २ कांस्यपदके. मिश्र आणि पुरुष प्रकारात सेमीफायनलमध्ये पराभूत.

18:24 (IST)26 Aug 2018
१० हजार मीटर धावणे

भारताच्या लक्ष्मणं गोविंदम याला कांस्यपदक. २९.४४.९१ वेळेत पूर्ण केली शर्यत

18:22 (IST)26 Aug 2018
मुष्टियुद्ध पुरुष

अंतिम १६च्या फेरीत ६० किलो वजनी गटात चीनच्या जून शानकडून भारताचा शिवा थापा पराभूत

17:44 (IST)26 Aug 2018
मोहम्मद अनासला रौप्य, धावपटूंची समाधानकारक कामगिरी

४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या मोहम्मद अनासनेही रौप्यपदकाची कमाई केली. त्याबरोबरच भारताला आजचे दिवसातील चौथे रौप्यपदक मिळाले. अनासने ४५.४९ सेकंदात शर्यत पार केली.

17:37 (IST)26 Aug 2018
हिमा दासला रौप्य, भारताचे दिवसातील तिसरे रौप्यपदक

४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या हिमा दासने रौप्यपदकाची कमाई केली. त्या बरोबरच भारताला आजचे दिवसातील तिसरे रौप्यपदक मिळाले.

17:09 (IST)26 Aug 2018
मुष्टियुद्ध पुरुष

६९ किलो वजनी गटात भारताचा मनोज कुमार ५-०ने पराभूत

17:06 (IST)26 Aug 2018
१०० मीटर धावणे

सेमीफायनलच्या शर्यतीत द्युतीचंद पास. ११.४३ सेकंदात शर्यत पूर्ण करत पुढील फेरीत दाखल.

16:20 (IST)26 Aug 2018
कम्पाऊंड नेमबाजी पुरुष

चिनी तैपई संघाला पराभूत करून भारतीय नेमबाजी संघ कम्पाऊंड नेमबाजी प्रकारात अंतिम फेरीत. चिनी तैपेई संघाचा केला २३०-२२७ असा पराभव. अंतिम फेरीत कोरियाशी देणार झुंज.

15:57 (IST)26 Aug 2018
टेबल टेनिस महिला

महिला टेबल टेनिस सांघिक प्रकारात अ गटात भारताच्या अहिका मुखर्जी, मनीका बत्रा आणि मधुरिका पाटकर यांच्या संघाचा चीनकडून ०-३ने पराभव

15:43 (IST)26 Aug 2018
कम्पाऊंड नेमबाजी पुरुष

भारतीय पुरुष नेमबाजी संघ उपांत्य फेरीत दाखल. उपांत्यपूर्व फेरीत फिलिपाइन्सचा २२७-२२६ अशा अटीतटीच्या लढतीत पराभव. उपांत्य फेरीत चिनी तैपेई संघाशी सामना

15:39 (IST)26 Aug 2018
मुष्टियुद्ध महिला

६१ किलो वजनी गटात भारताच्या सरजूबाला देवी हिने ताजिकिस्तानच्या मदिना घाफोरोव्हा हिला ५-० असे पराभूत केले.

15:01 (IST)26 Aug 2018
बॅडमिंटन महिला

भारताच्या सिंधूची थायलंडच्या जिंदापॉलवर २१-११, १६-२१, २१-१४ अशी मात. सायनापाठोपाठ सिंधूही पदकाच्या शर्यतीत दाखल. भारताचे किमान कांस्यपदक निश्चित

14:00 (IST)26 Aug 2018
नेमबाजी पुरुष

भारताचे अंगद वीर सिंग आणि शिराझ शेख दोघेही नेमबाज पात्रता फेरी पार करण्यात अयशस्वी

13:58 (IST)26 Aug 2018
कंपाउंड तिरंदाजी महिला

मुस्कान किरार, मधुमिता कुमारी आणि ज्योती सुरेखा वेन्नान या भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत धडक. चिनी तैपेई संघाचा केला ३-१(२२५-२२२) असा पराभव.

13:40 (IST)26 Aug 2018
व्हॉलीबॉल पुरुष

भारतीय व्हॉलीबॉल संघाचा जपानकडून ३-१ (२३-२५, २२-२५, २५-२३, २०-२५) असा पराभव.

13:30 (IST)26 Aug 2018
तिरंदाजी महिला

भारतीय संघाचा इंडोनेशियावर २२९-२२४ विजय. सेमीफायनल मध्ये प्रवेश

13:26 (IST)26 Aug 2018
बॅडमिंटन महिला

भारताच्या सायना नेहवालची थायलंडच्या रात्चनोक इंटानोनवर २१-१८, २१-१६ अशी मात. सायना पदकाच्या शर्यतीत दाखल. भारताचे किमान कांस्यपदक निश्चित

13:14 (IST)26 Aug 2018
नेमबाजी महिला

गानेमात सेकॉन आणि रश्मी राठोड यांचे स्किट शूटिंग प्रकारातील आव्हान संपुष्टात, पात्रता फेरी पार करण्यात अयशस्वी

12:42 (IST)26 Aug 2018
इक्वेस्ट्रीयन (घोडेस्वारी)

भारतीय घोडेस्वार फौहाद मिर्झाला रौप्यपदक. २६.४० वेळेत पूर्ण केली शर्यत. भारताला १९८२ नंतर प्रथमच मिळाले या क्रीडाप्रकारात पदक.  तसेच, सांघिक प्रकारातही रौप्य.

12:31 (IST)26 Aug 2018
सेलिंग (बोटींग)

५०० मीटर कॅनो प्रकारात भारतीय संघाची खराब कामगिरी, पदकाच्या शर्यतीतून बाहेर

11:29 (IST)26 Aug 2018
हँडबॉल पुरुष

भारताचा चिनी तैपेईकडून ३५ -३१ असा पराभव

10:16 (IST)26 Aug 2018
सेलिंग (बोटींग)

५०० मीटर कॅनो प्रकारात भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल

10:13 (IST)26 Aug 2018
कंपाउंड तिरंदाजी - पुरुष

भारताकडून कतारचा २२७-२१३ असा पराभव. कंपाउंड तिरंदाजी पुरुष प्रकारात भारताची 'अंतिम ८' मध्ये धडक

09:37 (IST)26 Aug 2018
महिला टेबल टेनिस

भारताचा कतारवर ३-० ने सहज विजय

09:30 (IST)26 Aug 2018
महिला - अडथळ्यांची शर्यत

भारताची अनु राघवन ४०० मीटर अडथळ्यांची शर्यत प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र. ५६.७७ वेळेत पूर्ण केली शर्यत

09:03 (IST)26 Aug 2018
महिला टेबल टेनिस

भारताच्या टेबल टेनिस संघाची सलामीची झुंज कतारशी.

09:03 (IST)26 Aug 2018

deleting_message