14 November 2019

News Flash

Asian Games 2018 : Bridge क्रीडा प्रकारात भारतीय जोडीला सुवर्णपदक

भारताच्या खात्यात १५ वं सुवर्णपदक

ब्रिज प्रकारामध्ये भारताला पहिल्यांदाच मोठं यश

इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. Bridge क्रीडा प्रकारात भारताची पुरुष जोडी प्रणब बर्धन आणि शिबनाथ डे यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतलं भारताचं हे १५ वं सुवर्णपदक ठरलं आहे. अखेरच्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय बॉक्सर अमित पांघलने सुवर्णपदकाची कमाई केली होती.

 

भारतीय जोडीने अंतिम फेरीपर्यंत ३८४ गुणांसह आपलं अव्वल स्थान कायम राखलं.चीनच्या लिक्सीन यँग आणि चेन वोन जोडीला रौप्य तर इंडोनेशियाच्या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.

First Published on September 1, 2018 1:49 pm

Web Title: asian games 2018 india adds 15th gold medal to his tally as bridge mens pair bags gold