इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने Sailing क्रीडा प्रकारात ३ पदकांची कमाई केली आहे. 49er FX Women’s प्रकारात भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेर्वेगर जोडीने रौप्य पदकाची कमाई केली. Sailing क्रीडा प्रकारात यंदाच्या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं. यानंतर भारताच्या हर्षिता तोमरने Open Laser 4.7 प्रकारात कांस्यपदक पटकावलं. याचसोबत वरुण ठक्कर आणि गणपती चेंगप्पा जोडीने 40er Mens प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

२० वर्षीय श्वेता आणि २७ वर्षीय वर्षा यांच्या जोडीने पहिल्या १५ प्रयत्नांनंतर ४० गुणांची कमाई करत दुसरं स्थान पटकावलं. तर १६ वर्षीय हर्षिता तोमरने १२ प्रयत्नांनर ६२ गुणांची कमाई केली. “माझ्यासाठी हा अनुभव शब्दात न सांगणारा आहे. माझ्यासारख्या तरुण खेळाडूसाठी ही स्पर्धा एक चांगला अनुभव ठरला आहे.” कांस्यपदक विजेत्या हर्षिता तोमरने आपली भावना व्यक्त केली.