आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सध्या भारतीय पथकातील खेळाडू समाधानकारक कामगिरी करत आहेत. सातव्या दिवसांपर्यंत भारताने ७ सुवर्ण पदके मिळवली. पण आठव्या दिवसात भारताला सुवर्णपदक मिळवणे अद्याप शक्य झाले नाही. धावपटूंकडून भारताला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. पण भारताच्या दोन धावपटूंनी रौप्य पदक पटकावले. तर एका धावपटूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. पण एका विचित्र कारणाने भारताला मिळलेले हे पदक गमवावे लागले.

भारताच्या लक्ष्मणं गोविंदम याने यंदाच्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. लक्ष्मणने १० हजार मीटरचे अंतर २९.४४.९१ इतक्या वेळेत कापले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने भारताला कांस्यपदक कमावून दिले होते. पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे त्याचे हे पदक भारतासाठी ऐतिहासिक ठरले होते. या क्रीडाप्रकारात गेल्या २० वर्षात प्रथमच भारताला हे पदक मिळाले होते. पण पाऊल बाहेर पडल्यामुळे लक्ष्मणं गोविंदमने याला हे कांस्यपदक गमवावे लागले.

News Flash: Athletics | Govindan Lakshmanan wins Bronze medal in Men’s 10,000m
After 20 yrs we have got a medal in the event. Amazing effort #AsianGames2018 pic.twitter.com/J8pfE7mUhW

; India@AsianGames2018 (@India_AllSports) August 26, 2018

याशिवाय, ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या दोनही धावपटूंनी सूयावरण पदक कमावण्याची संधी गमावली. भारतीय महिला धावपटू हिमा दास हिने रौप्यपदकाची कमाई केली. तिने ५०. ७९ सेकंदात शर्यत पार केली. तर दुसरीकडे ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासनेही रौप्यपदकाची कमाई केली. अनासने ४५.४९ सेकंदात शर्यत पार केली. या कामगिरीबरोबर भारताने अनासची स्पर्धा संपेपर्यंत दिवसात ४ रौप्यपदकांची कमाई केली होती.