भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा प्रकारात ऐतिहासीक कांस्यपदकाची कमाई केली आहे. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताला दक्षिण कोरियाकडून ३-० अशी हार पत्करावी लागली. भारताचे जी. सत्ययन, अचंता थरथ कमाल आणि ए. अमलराज यांना उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
जागतिक क्रमवारीत ३९ व्या क्रमांकावर असलेल्या सथ्यनने सामन्याची सुरुवात चांगली केली होती. मात्र पहिला सेट ११-९ ने जिंकल्यानंतर पुढचे तिन्ही सेट सत्यनने गमावले. यानंतर अनुभवी शरथ कमालची डाळही फारकाळ शिजू शकली नाही. अमलराजने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही पराभवाचा सामना करावा लागला. अखेर उपांत्य फेरीत झालेल्या पराभवामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 4:17 pm