News Flash

Asian Games 2018 : जपानवरील विजयासोबत भारतीय हॉकी संघाचा नवीन विक्रम

भारताची जपानवर ८-० ने मात

भारतीय संघाचं संग्रहीत छायाचित्र

भारतीय हॉकी संघ सध्या चांगलाच फॉर्मात आहे. जपानवर ८-० ने मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. जपानवरील विजयानंतर भारतीय संघाने एशियाड स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. १९८२ साली झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या नावावर आधी या विक्रमाची नोंद होती. झफर इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४५ गोलची नोंद केली होती. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत ५१ गोलची नोंद केली आहे.

आशियाई स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्यास भारतीय संघाला २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. साखळी सामन्यात भारतीय संघासमोर मोठं आव्हान नसलं तरीही पुढच्या फेरीत भारताला मलेशिया, पाकिस्तान यांच्यासारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागू शकतो. २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानवर पेनल्टी शूटआऊटवर मात करुन विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे भारतीय संघ आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 1:25 pm

Web Title: asian games 2018 indian mens hockey team breaks the record for highest number of tournament goals
Next Stories
1 Ind vs Eng : …तरीही बुमराहला गोलंदाज म्हणून निवडलं नसतं – मायकल होल्डिंग
2 Asian Games 2018 : जाणून घ्या इराणच्या कबड्डीतील विजयामागचं भारतीय कनेक्शन
3 शिल्पा शेट्टीचा पती बुकीच्या संपर्कात : तपास अधिकाऱ्याचा दावा
Just Now!
X