News Flash

Asian Games 2018 : ‘डोळे झाकून’ द्युती चंदने मिळवले रौप्यपदक

केवळ ०.०२ सेकंदाच्या फरकाने द्युतीचे सुवर्णपदक हुकले.

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या द्युती चंदवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्युतीने १०० मी. शर्यतीच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले आणि रौप्य पदकाची कमाई केली. केवळ ०.०२ सेकंदाच्या फरकाने द्युतीचे सुवर्णपदक हुकले. पण तिने भारताला एक रौप्यपदक मिळवून दिले.

या विजयाबाबत बोलताना द्यूतीने एक अजब गोष्ट सांगितली. ती म्हणाली की मी धावताना डोळे बंद ठेवले होते आणि शर्यत संपताना मी माझे डोळे उघडले. २०१४ हे वर्ष माझ्यासाठी फार कठीण होते. माझ्याबद्दल अनेकांनी अनेक तर्कवितर्क लावले. माझ्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण आज त्याच मुलीने आज देशासाठी पदक मिळवले आहे हि मोठी गोष्ट आहे, असेही ती म्हणाली.

दरम्यान, ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी चंदला बक्षिसाची घोषणा केली आहे. ओडीशा सरकारने द्युतीच्या या कामगिरीसाठी १.५ कोटींचं इनाम घोषित केले आहे. याचसोबत ओडीशा ऑलिम्पिक असोसिएशननेही द्युतीला ५० हजाराचं बक्षिस जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 10:48 pm

Web Title: asian games 2018 indian sprinter dutee chand won silver medal with closed eyes
Next Stories
1 Asian Games 2018 : सुवर्णपदक विजेत्या नीरजने केला ‘हा’ विक्रम
2 Ind vs Eng : …तर अँडरसनला कोणीही रोखू शकत नाही – ग्लेन मॅग्रा
3 Asian Games 2018 : नीरज चोप्राच्या भाल्याचा ‘सुवर्ण’वेध
Just Now!
X