24 October 2020

News Flash

Asian Games 2018 Badminton : भारतीय महिलांसमोर खडतर आव्हान, पुरुषांना सोपा ड्रॉ

भारतीय महिलांना जपानचं खडतर आव्हान

सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू (संग्रहीत छायाचित्र)

१८ व्या एशियाड स्पर्धांना आजपासून सुरुवात होणार आहे. इंडोनेशियाच्या जकार्ता येथे या स्पर्धेचा सोहळा रंगणार आहे. या स्पर्धेत कुस्ती, बॅडमिंटन, नेमबाजी यासारख्या प्रमुख खेळांमधून भारताला पदकाची आशा आहे. भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी नुकताच स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय महिलांना या स्पर्धेत खडतर आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मात्र तुलनेत पुरुष खेळाडूंना सोपं आव्हान असणार आहे.

पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यासारख्या खेळाडूंना पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आल्यामुले भारतीय खेळाड उपांत्यपूर्व सामन्यात खेळणार आहेत. या सामन्यात भारतीय महिलांना जपानचं तगडं आव्हान मिळणार आहे. अकाने नामागुची, नोझुमी ओकुहारा यासारख्या मातब्बर खेळाडू भारतीय खेळाडूंसमोर उभ्या ठाकण्याची शक्यता आहे.

भारतीय पुरुषांना पहिल्या फेरीत मालदीवच्या खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुषांना यजमान इंडोनेशियाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

एशियाड स्पर्धेसाठी भारतीय टेनिस संघ –

पुरुष : किदम्बी श्रीकांत, एच.एस.प्रणॉय, बी. साई प्रणीत, समीर वर्मा, सौरभ वर्मा, सत्विकसाईराज रणकीरेड्डी, चिराग शेट्टी, मनु अत्री, बी. सुमिथ रेड्डी, प्रणव जेरी चोप्रा

महिला : पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, आश्विनी पोनाप्पा, एन. सिकी रेड्डी, अस्मिता चलीहा, सई उत्तेजिता राव, आकर्षी कश्यप, ऋतुपर्णा पांडा, गायत्री गोपीचंद, आरती सारा सुनील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 1:05 pm

Web Title: asian games 2018 indian women face mighty japanese men have it easier
Next Stories
1 Kerla Floods: बंगळुरु एफसी फुटबॉल क्लबचा केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात
2 Asian Games 2018 : भारतीय कबड्डी संघाचे वेळापत्रक जाहीर
3 Asian Games 2018 : जाणून घ्या एशियाडच्या सामन्यांची वेळ, तारीख, कोणत्या वाहिनीवर पाहाल सामन्यांचं प्रक्षेपण
Just Now!
X