12 December 2019

News Flash

Asian Games 2018 : अरपिंदर सिंहची ‘तिहेरी उडी’ सुवर्णपदकावर

भारताचं स्पर्धेतलं आतापर्यंतचं दहावं सुवर्णपदक

अरपिंदर सिंहची विक्रमी उडी

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अकराव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर पडली आहे. तिहेरी उडीत भारताच्या अरपिंदर सिंहने सुवर्णपदकची कमाई केली आहे. या स्पर्धेतलं भारताचं हे दहावं सुवर्णपदक ठरलंय. तर आजच्या दिवसातलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

याच प्रकारात भारताचा राकेश बाबुही अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र पदकांच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखणं त्याला जमलं नाही. मात्र अरपिंदरने पहिल्या प्रयत्नापासून सर्वोत्तम कामगिरी करत आपलं अव्वल स्थान कायम राखलं. सहा प्रयत्नांमध्ये एकाही खेळाडूने अरपिंदरच्या प्रयत्नांना टक्कर दिली नाही.

First Published on August 29, 2018 6:30 pm

Web Title: asian games 2018 indonesia arpindar singh bags gold medal in tripal jump
टॅग Asian Games 2018
Just Now!
X