11 July 2020

News Flash

Asian Games 2018 Live : स्वप्ना आणि अरपिंदर सिंहमुळे भारताला ‘सुवर्ण’ यश

अॅथलेटिक्समध्ये भारताला पदकाच्या आशा

भारताची धावपटू द्युती चंदने २०० मी शर्यतीत पुन्हा एकदा रौप्य पदकाची कमाई केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या अकराव्या दिवशी भारताला मिळालेलं हे पहिलं रौप्यपदक ठरलं आहे. या स्पर्धेतलं भारताचं आतापर्यंतचं हे ५२ वं पदक ठरलं. याआधी १०० मी. शर्यतीच्या अंतिम फेरीमध्येही द्युतीला रौप्य पदक मिळालं होतं. ०.०२ सेकंदाच्या फरकामुळे द्युतीला १०० मी. शर्यतीमध्ये सुवर्णपदकावर पाणी सोडावं लागलं होतं. या स्पर्धेतलं द्युतीचं हे दुसरं पदक ठरलं.

त्याआधी टेबल टेनिसमध्ये भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने कांस्यपदकाची कमाई करत भारताचं पदकांचं खातं उघडून दिलं. उपांत्य सामन्यात भारतीय जोडीला चीनकडून ४-१ ने पराभव स्विकारावा लागला, यामुळे भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. याआधी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय जोडीने कोरियन प्रतिस्पर्ध्यावर ३-२ ने मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. या सामन्यात भारताने पिछाडी भरुन काढत उपांत्य फेरीत आपलं स्थान नक्की केलं होतं. आजच्या दिवसातलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं.

याव्यतिरीक्त भारतीय बॉक्सर विकास क्रिशन, अमित फांगल आणि महिला स्क्वॉश संघाने भारतासाठी एक पदक निश्चीत केलं आहे. मात्र दुर्दैवाने भारताच्या धीरज या बॉक्सरला मंगोलिच्या प्रतिस्पर्ध्याकडून ५-० असा पराभव स्विकारावा लागला. यामुळे भारताला आणखी एका पदकाला मुकावं लागलं.

Live Blog

Highlights

 • 17:35 (IST)

  अॅथलेटिक्स - महिला २०० मी. शर्यत

  भारताच्या द्युती चंदला रौप्यपदक

 • 17:31 (IST)

  अचंता कमाल - मनिका बत्रा जोडीमुळे भारताच्या खात्यात ५१ वं पदक

 • 14:19 (IST)

  बॉक्सिंग - पुरुष

  ७५ किलो वजनी गटात भारताचा विकास क्रिशन उपांत्य फेरीत. अटीतटीच्या लढाईत चीनच्या प्रतिस्पर्ध्यावर ३-२ ने मात. बॉक्सिंगमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चीत

 • 13:05 (IST)

  टेबल टेनिस

  भारताची  अचंता शरथ कमाल आणि मनिका बत्रा ही दुहेरी जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल. मलेशियावर ३-० ने केली मातमिश्र दुहेरीत मधुरिका पाटकर आणि अँथनी अमलराज जोडीची इंडोनेशियावर ३-१ ने मात, उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल

 • 10:16 (IST)

  Canoe/Kayak Sprint

  ५०० मी. प्रकारात भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल

  तर १००० मी. प्रकारात भारताचे नाओचा सिंह, चिंग चिंग सिंह अब्राहम उपांत्य फेरीत

20:00 (IST)29 Aug 2018
भारतीय महिला हॉकी संघाची फायनलमध्ये धडक

भारतीय महिला हॉकी संघाने १-० ने चीनचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे

19:00 (IST)29 Aug 2018
Heptathlon - भारताच्या स्वप्ना बर्मनला सुवर्णपदक

पात्रता फेरीमध्ये पहिल्या दोन निकषांमध्ये पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने ८०० मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताच्या खात्यातले हे ११ वे सुवर्णपदक. 

18:26 (IST)29 Aug 2018
अॅथलेटिक्स - तिहेरी उडी

भारताच्या अरपिंदर सिंहला सुवर्णपदक

18:09 (IST)29 Aug 2018
अॅथलेटिक्स - १५०० मी शर्यत

भारताचा मनजीत सिंह अंतिम फेरीत दाखल

मनजीतचा साथीदार जिनसन जॉन्सनही अंतिम फेरीत दाखल

17:43 (IST)29 Aug 2018
बॉक्सिंग - पुरुष

६४ किलो वजनी गटात भारताच्या धीरज रंगीचं आव्हान संपुष्टात, मंगोलियाच्या प्रतिस्पर्ध्याने ५-० ने केला पराभव

17:35 (IST)29 Aug 2018
अॅथलेटिक्स - महिला २०० मी. शर्यत

भारताच्या द्युती चंदला रौप्यपदक

17:31 (IST)29 Aug 2018
अचंता कमाल - मनिका बत्रा जोडीमुळे भारताच्या खात्यात ५१ वं पदक
17:02 (IST)29 Aug 2018
अकराव्या दिवशी भारताने पदकाचं खातं उघडलं

टेबल टेनिस मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या अचंता कमाल - मनिका बत्रा जोडीला कांस्यपदक, उपांत्य फेरीत चीनच्या जोडीकडून भारत ४-१ ने पराभूत

15:34 (IST)29 Aug 2018
टेबल टेनिस - मिश्र दुहेरी

भारताची अचंता शरथ कमाल आणि मनिका बत्रा जोडी उपांत्य फेरीत, भारताचं आणखी एक पदक निश्चीत

15:06 (IST)29 Aug 2018
Sepak Takraw (महिला)

व्हिएतनामची भारतीय संघावर २-० ने मात

14:26 (IST)29 Aug 2018
भारतीय महिला बॉक्सर्सचं आव्हान संपुष्टात

५१ किलो वजनी गटात भारताची सरजूबाला देवी चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून ५-० ने पराभूत

14:22 (IST)29 Aug 2018
टेबल टेनिस - मिश्र दुहेरी

अंचता शरथ कमाल आणि मनिका बत्रा जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, अटीतटीच्या लढतीत भारतीय जोडीची जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोरियन प्रतिस्पर्ध्यावर ३-२ ने मात

14:21 (IST)29 Aug 2018
कुराश

भारताचं आव्हान संपुष्टात, मनिष टोकस आणि कुणाल आपापल्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत

14:20 (IST)29 Aug 2018
हँडबॉल - पुरुष

भारताची इंडोनेशियावर ३७-२३ ने मात

14:19 (IST)29 Aug 2018
बॉक्सिंग - पुरुष

७५ किलो वजनी गटात भारताचा विकास क्रिशन उपांत्य फेरीत. अटीतटीच्या लढाईत चीनच्या प्रतिस्पर्ध्यावर ३-२ ने मात. बॉक्सिंगमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चीत

13:39 (IST)29 Aug 2018
टेबल टेनिस

मिश्र दुहेरीत भारताच्या मधुरिका पाटकर-अँथनी अमलराज जोडी हाँग काँगकडून ३-१ ने पराभूत

13:08 (IST)29 Aug 2018
स्क्वॉश - महिला सांघिक

भारतीय महिलांचा सलग चौथा विजय, चीनवर ३-० ने केली मात. या विजयासह भारत उपांत्य फेरीत दाखल. उपांत्य फेरीत भारतासमोर हाँग काँगचं आव्हान

13:06 (IST)29 Aug 2018
बॉक्सिंग - पुरुष

४९ किलो वजनी गटात भारताचा अमित फांगल उपांत्य फेरीत दाखल, भारताचं एक पदक निश्चीत

13:05 (IST)29 Aug 2018
टेबल टेनिस

भारताची  अचंता शरथ कमाल आणि मनिका बत्रा ही दुहेरी जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल. मलेशियावर ३-० ने केली मातमिश्र दुहेरीत मधुरिका पाटकर आणि अँथनी अमलराज जोडीची इंडोनेशियावर ३-१ ने मात, उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल

10:19 (IST)29 Aug 2018
सायकलिंग

पुरुषांच्या ४ हजार मी. शर्यतीत भारत पदकांच्या शर्यतीमधून बाहेर

10:16 (IST)29 Aug 2018
Canoe/Kayak Sprint

५०० मी. प्रकारात भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल

तर १००० मी. प्रकारात भारताचे नाओचा सिंह, चिंग चिंग सिंह अब्राहम उपांत्य फेरीत

10:13 (IST)29 Aug 2018
अॅथलेटिक्स - चालण्याची शर्यत

भारतीय महिला आणि पुरुषांचं आव्हान संपुष्टात

10:02 (IST)29 Aug 2018
ज्युडो - पुरुष

भारताचा विजय कुमार उझबेगिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून १०-० ने पराभूत

09:34 (IST)29 Aug 2018
Pencak Silat

भारतीय महिला अंतिम फेरीत अखेरच्या स्थानावर

09:22 (IST)29 Aug 2018
Sepak Takraw

भारतीय महिला मलेशिया संघाकडून २-० ने पराभूत

08:29 (IST)29 Aug 2018
अॅथलेटिक्स - महिला उंच उडी

पुर्णिमा हेरंबम - ७९० पॉईंट

स्वप्ना बर्मन - ८५६ पॉ़ईंट

टॅग Asian Games 2018
Next Stories
1 Asian Games 2018 : कम्पाऊंड तिरंदाजीत ‘रौप्य’वर निशाणा
2 Asian Games 2018 : भारताकडून श्रीलंकेचा २०-० गोलने धुव्वा
3 पिंकीची रौप्यपदकाला गवसणी; मलप्रभाला कांस्यपदक
Just Now!
X