आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तेराव्या दिवशी भारताचा बॉक्सर अमित पांघलने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ४९ किलो वजनी गटात अमितने उपांत्य फेरीत
फिलीपाईन्सचा आपला प्रतिस्पर्धी कार्लो पालमवर मात केली आहे. २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रेवश मिळवणारा अमित एकमेव बॉ़क्सर ठरला आहे. अंतिम फेरीत अमितचा सामना उझबेगिस्तानच्या हसनशी होणार आहे.

त्याआधी भारताचा आघाडीचा बॉक्सर विकास क्रिशनला ७५ किलो वजनी गटात आज कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे. आपल्या उपांत्य सामन्यात कझाकिस्तानच्या अमानकुल अबिलखानविरुद्ध खेळत असताना विकासच्या डाव्या डोळ्याच्या वर झालेल्या दुखापत झाली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर विकास उपांत्य सामना खेळण्यासाठी फिट नसल्याचं घोषित करण्यात आलं. या कारणामुळे कझाकिस्तानच्या खेळाडूला अंतिम फेरीत चाल देण्यात आली व विकासला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. विकासचं आशियाई खेळांमधलं हे तिसरं पदक ठरलं. याआधी २०१० साली झालेल्या स्पर्धेत विकासने ६० किलो वजनी गटात सुवर्ण, २०१४ साली झालेल्या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती.

दरम्यान स्क्वॉशमध्ये भारतीय महिलांनी मलेशियावर २-० ने मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या विजयासह भारताचं आणखी एक पदक निश्चीत झालेलं आहे. मात्र पुरुष संघाला उपांत्य फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला असल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. आजच्या दिवसाच्या खेळाचे लाईव्ह अपडेट तुम्ही लोकसत्ता.कॉमवर पाहू शकणार आहात.

Live Blog

20:27 (IST)31 Aug 2018
महिला हॉकी

अंतिम फेरीत जपानची भारतावर २-१ ने मात, भारतीय महिलांना रौप्यपदक

17:43 (IST)31 Aug 2018
Sailing

भारताच्या वरुण ठक्कर-गणपती चेंगप्पा जोडीला कांस्यपदक

17:10 (IST)31 Aug 2018
सॉफ्ट टेनिस - महिला

भारतीय महिला थायलंडकडून ३-० ने पराभूत

17:08 (IST)31 Aug 2018
बॉक्सिंग - पुरुष

४९ किलो वजनी गटात भारताच्या अमित पांघलची कार्लो पालमवर मात, अंतिम फेरीत प्रवेश. अमित सुवर्णपदकाच्या शर्यतीत

17:07 (IST)31 Aug 2018
स्क्वॉश - पुरुष

उपांत्य फेरीत हाँग काँगची भारतावर २-० ने मात, भारताच्या खात्यात आणखी एक कांस्यपदक

15:19 (IST)31 Aug 2018
सॉफ्ट टेनिस

भारताचं आव्हान संपुष्टात, पुरुष संघ इंडोनेशियाकडून ०-३ ने पराभूत. महिला संघ कोरियाकडून ३-० ने पराभूत

14:56 (IST)31 Aug 2018
Sailing

वर्षा गौतम आणि श्वेता शेर्वेगर जोडीला रौप्य तर हर्षिता तोमरला कांस्यपदक

14:54 (IST)31 Aug 2018
Bridge

भारताची पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी जोडी अंतिम फेरीत दाखल

12:06 (IST)31 Aug 2018
विकास क्रिशनच्या मार्गात दुखापतीचा खोडा, कांस्यपदावर मानावं लागलं समाधान

७५ किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर विकास क्रिशनला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. उपांत्य सामन्यात विकास क्रिशलना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. 

12:04 (IST)31 Aug 2018
सॉफ्ट टेनिस - महिला

प्राथमिक फेरीत भारतीय महिलांची मंगोलियावर ३-० ने मात

12:04 (IST)31 Aug 2018
स्क्वॉश - महिला

मलेशियावर २-० ने मात करुन भारतीय महिला अंतिम फेरीत दाखल, भारताचं आणखी एक पदक निश्चीत

11:21 (IST)31 Aug 2018
टेबल टेनिस - महिला

मनिका बत्राच्या पदरातही पराभव, चीनच्या वँग मन्यू ने ४-१ ने केली मात

11:20 (IST)31 Aug 2018
टेबल टेनिस - पुरुष

अचंता शरथ कमाल चीन तैपेईच्या प्रतिस्पर्ध्याकडून ४-२ ने पराभूत

11:17 (IST)31 Aug 2018
व्हॉलिबॉल - महिला

भारतीय महिला चीन तैपेईकडून ३-० ने पराभूत

11:16 (IST)31 Aug 2018
सॉफ्ट टेनिस

कंबोडीयाची भारतावर ३-० ने मात

10:12 (IST)31 Aug 2018
ज्युडो - पुरुष

१०० किलो वजनी गटात भारताचा अवतार सिंह पराभूत

10:07 (IST)31 Aug 2018
सायकलिंग

भारताचे रणजित सिंह आणि एस्को अल्बान अपयशी

10:06 (IST)31 Aug 2018
सुवर्णपदकासाठी भारतीय महिला संघाची जोरदार तयारी

सुवर्णपदकासाठी भारताची आज जपानसोबत लढत

10:04 (IST)31 Aug 2018
ज्युडो - महिला

७८ किलो वजनी गटात भारताच्या राजविंदर कौरचं आव्हान संपुष्टात

10:04 (IST)31 Aug 2018
Canoe

भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात