27 November 2020

News Flash

Asian Games 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाटला सुवर्ण; नेमबाजपटू दिपक कुमार, लक्ष्यची ‘रौप्य’कमाई

दुसऱ्या दिवसाच्या खेळाचे लाईव्ह अपडेट्स

विनेश फोगटची इंडोनेशियात ऐतिहासिक कामगिरी

आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या युकी आईरीवर मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. पहिल्या डावात विनेशने बेसावध असलेल्या जपानच्या आईरीला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा हा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरीही यातून तिने ४ गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. मात्र दुसऱ्या डावात अखेरच्या सेकंदांमध्ये विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चीतपट करत सामना आपल्या नावावर केला. याआधी कुस्तीत भारताला बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले होते.

आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय नेमबाजांनी पदकं मिळवण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली आहे. आजच्या दिवसातलं भारताचं नेमबाजीतलं हे दुसरं पदक ठरलं आहे. भारताच्या मानवजीत सिंह संधूने ट्रॅप नेमबाजीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र पदकांच्या  शर्यतीमधून त्याला बाहेर पडावं लागलं. लक्ष्यने मात्र संयमी खेळ करत अंतिम दोघांमध्ये आपलं स्थान कायम राखत, भारताला आणखी एका पदकाची कमाई करुन दिली. आजच्या दिवसातलं नेमबाजीमधलं भारताचं हे दुसरं रौप्यपदक ठरलं आहे. आज सकाळी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली होती.

त्यामुळे भारताची पदकांची संख्या एकूण ५ झाली असून त्यात २ सुवर्ण आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.

Live Blog

Highlights

  • 15:42 (IST)

    भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर

    ट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली. अंतिम फेरीत भारताच्या मानवजितसिंह संधूनेही स्थान मिळवलं होतं, मात्र उत्तरार्धात संंधूची कामगिरी खालावल्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेला. आजच्या दिवसातलं भारताचं नेमबाजीमधलं हे दुसरं पदक ठरलं आहे.

  • 09:44 (IST)

    नेमबाजी - १० मी. एअर रायफल

    भारताच्या दिपक कुमारची १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्य पदकाची कमाई. रवी कुमार चौथ्या स्थानावर

21:13 (IST)20 Aug 2018
पुरुष हॉकी

भारताने इंडोनेशियाविरुद्ध १७-० असा धडाकेबाज विजय मिळवला. आशियाई स्पर्धांमधील हा भारताचा सर्वात मोठ्या फरकाचा विजय ठरला.

19:22 (IST)20 Aug 2018
कुस्ती

महिला  कुस्तीपटू साक्षी मलिक हिला कांस्य पदकाच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.  उत्तर कोरियाच्य रिम जोंग सिंग हिने साक्षीचा ४-१ ने पराभूत केले.  त्यामुळे साक्षीचे कांस्यपदक हुकले 

18:45 (IST)20 Aug 2018
५७ किलो वजनी गट महिला कुस्ती

कांस्यपदकाच्या लढतीत पुजा धांडा पराभूत

17:54 (IST)20 Aug 2018
विनेश फोगाटला सुवर्णपदक, एशियाडमध्ये कुस्तीत सुवर्णपदक मिळवणारी विनेश पहिली भारतीय महिला

अंतिम फेरीत विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे.

17:06 (IST)20 Aug 2018
व्हॉलीबॉल

भारतीय पुरुष संघाची हाँगकाँगवर २७-२५, २५-२२, २५-१९ ने केली मात

16:48 (IST)20 Aug 2018
टेनिस

एकेरीच्या सामन्यात भारताच्या प्रंजेश गुणशेखरनची इंडोनेशियाच्या रफिकीवर ६-२, ६-० ने मात. महिला दुहेरीत भारताच्या अंकिता रैना-प्रार्थना ठोंबरेची पाकिस्तानच्या जोडीवर ६-०. ६-० ने मात

16:46 (IST)20 Aug 2018
बॅडमिंटन सांघिक पुरुष

उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाची भारतावर ३-१ ने मात. भारताकडून एच. एस. प्रणॉयने जिंकला एकमेव सामना

15:47 (IST)20 Aug 2018
कुस्ती पुरुष - सुमीत मलिक कांस्यपदकासाठी खेळणार

१२५ किलो वजनी गटात सुमीत मलिकने आपला सामना जिंकलेला असून तो आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे.

15:44 (IST)20 Aug 2018
कबड्डी पुरुष - दक्षिण कोरियाकडून भारत पराभूत

आशियाई खेळांच्या साखळी सामन्यात माजी विजेत्या भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. दक्षिण कोरियाने भारतावर अटीतटीच्या लढाईत २४-२३ अशी मात केली. भारतीय संघासाठी हा धक्कादायक निकाल मानला जातो आहे.

15:42 (IST)20 Aug 2018
भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर

ट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली. अंतिम फेरीत भारताच्या मानवजितसिंह संधूनेही स्थान मिळवलं होतं, मात्र उत्तरार्धात संंधूची कामगिरी खालावल्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेला. आजच्या दिवसातलं भारताचं नेमबाजीमधलं हे दुसरं पदक ठरलं आहे.

14:24 (IST)20 Aug 2018
महिला कुस्ती - विनेश फोगट अंतिम फेरीत दाखल

५० किलो वजनी गटात विनेश फोगटने भारतासाठी एक पदक निश्चीत केलं आहे. उपांत्य फेरीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर १०-० ने मात करत विनेश अंतिम फेरीत दाखल

14:18 (IST)20 Aug 2018
भारताला धक्का, साक्षी मलिक उपांत्य सामन्यामधून बाहेर

सुवर्णपदकाच्या शर्यतीत असलेल्या साक्षी मलिकला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. अखेरच्या काही सेकंदांमध्ये बचाव न करता आल्यामुळे साक्षी कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून पराभूत

13:39 (IST)20 Aug 2018
महिला कुस्ती

- विनेश फोगट, पुजा धांडा आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरीत दाखल. पिंकीला मात्र पराभवाचा धक्का. साक्षी मलिक उपांत्य फेरीत दाखल. - उपांत्य फेरीत पुजा धांडा पराभूत

13:01 (IST)20 Aug 2018
महिला ट्रॅप नेमबाजी

भारताच्या सीमा तोमरचा निराशाजनक खेळ, अंतिम फेरीतून सीमा बाहेर

12:29 (IST)20 Aug 2018
महिला कुस्ती

५७ किलो वजनी गटात भारताच्या पुजा धांडाची थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर १०-० ने मात. ५३ किलो वजनी गटात भारताच्या पिंकीलाही पराभवाचा धक्का

12:21 (IST)20 Aug 2018
पुरुष कुस्ती

१२५ किलो वजनी गटात भारताचा सुमीत इराणच्या परवेझकडून १०-० ने पराभूत

11:47 (IST)20 Aug 2018
महिला कुस्ती

भारताच्या विनेश फोगटची ५० किलो वजनी गटात चीनच्या सुन यानवर मात. 

11:39 (IST)20 Aug 2018
हँडबॉल

भारतीय पुरुष संघाची मलेशियावर ४५-१९ ने मात

11:24 (IST)20 Aug 2018
बॅडमिंटन - महिला सांघिक

आश्विनी पोनाप्पा - पी. व्ही. सिंधूचा दुहेरी सामन्यात पराभव. उपांत्यपूर्व सामन्यात जपानकडून भारतीय महिलांचा संघ ३-१ ने पराभूत

11:21 (IST)20 Aug 2018
१० मी. एअर रायफल - महिला

भारताची अपुर्वी चंदेला अंतिम फेरीतून बाहेर. नेमबाजीत आणखी एका हक्काच्या पदकाला भारत मुकला

11:14 (IST)20 Aug 2018
टेनिस - महिला

भारताच्या अंकिता रैनाचा पुढच्या फेरीत प्रवेश

10:35 (IST)20 Aug 2018
कबड्डी

भारतीय महिलांची साखळी सामन्यात थायलंडवर ३३-२३ ने मात

10:23 (IST)20 Aug 2018
'फुलराणी' सायना नेहवालला सलामीच्या सामन्यात पराभवाचा धक्का

सायना नेहवालला जपानच्या नोझुमी ओकुहाराने २१-११, २३-२५, २१-१६ अशा सेट्समध्ये पराभव केला.

09:44 (IST)20 Aug 2018
नेमबाजी - १० मी. एअर रायफल

भारताच्या दिपक कुमारची १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्य पदकाची कमाई. रवी कुमार चौथ्या स्थानावर

08:56 (IST)20 Aug 2018
नेमबाजी - १० मी. एअर रायफल

भारताचे दिपक कुमार आणि रवी कुमार हे नेमबाज अंतिम फेरीत दाखल. भारताची पदकाची आशा वाढली

08:55 (IST)20 Aug 2018
रोविंग

भारताचा दुष्यंत सिंह लाईटवेट स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत दाखल

08:35 (IST)20 Aug 2018
जलतरण

५० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात भारताच्या श्रीहरी नटराज प्राथमिक फेरीत यशस्वी, ८०० मी. फ्रिस्टाईल प्रकारात भारताचा अद्वैत पहिल्या फेरीत तिसऱ्या स्थानावर

08:21 (IST)20 Aug 2018
बॅडमिंटन

भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीवर सरळ दोन सेट्समध्ये मात करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. सिंधूने यामागुचीचा २१-१८, २१-१९ असा पराभव केला.

टॅग Asian Games 2018
Next Stories
1 सोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज
2 Ind vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली ‘ही’ कमाल…
3 Asian Games 2018 : बजरंगची ‘सुवर्ण’ कामगिरी स्व. अटलजींना समर्पित
Just Now!
X