आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी नेमबाजांनी भारताला पहिलं पदक मिळवून देण्याचं काम केलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळालं आहे. पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान पटकावलं होतं. सौरभच्या या कामगिरीसाठी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने ५० लाखांचं इनाम घोषित केलं आहे. दुसरीकडे ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्य पदकाची कमाई केली.

दरम्यान ५० मी. फ्रिस्टाईल जलतरण प्रकारात महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. अवघ्या एका सेकंदाच्या फरकाने वीरधवलंचं या अंतिम स्पर्धेतलं पदक हुकलं आहे. पात्रता फेरीत त्याने केलेल्या कामगिरीवरुन भारताला पदकची आशा निर्माण झाली होती. मात्र त्याच्या पदरात अखेर अपयशच पडलं. कुस्तीत दिव्या काकरानने रेपिचाच प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. तर Sepak Takraw क्रीडा प्रकारात भारतीय संघाने सांघिक कांस्यपदकाची कमाई केली आहे. रोविंगमध्ये भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे यामधूनही भारताला पदकाची आशा आहे. तसेच ६८ किलो वजनी गट फ्रिस्टाईल प्रकारात भारताच्या दिव्या काकरानला कांस्यपदक मिळाले. चीनी तैपेईच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा तिने पराभव केला.

Live Blog

22:25 (IST)21 Aug 2018
महिला हॉकी

भारताच्या महिला संघाने आज कझाकस्तानच्या संघाला २१-० असे पराभूत केले. मात्र महिला संघाला विक्रम मोडण्यासाठी १ गोल कमी पडला.

17:53 (IST)21 Aug 2018
जिमनॅस्टीक

भारताची दिपा कर्माकर अंतिम फेरीतून बाहेर. भारताच्या पदकाच्या आशेवर पाणी

17:50 (IST)21 Aug 2018
कुस्ती महिला

६८ किलो वजनी गट फ्रिस्टाईल प्रकारात भारताच्या दिव्या काकरानला कांस्यपदक. चीन तैपेईच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा केला पराभव

17:09 (IST)21 Aug 2018
टेनिस

मिश्र दुहेरी प्रकारात भारताची रोहन बोपण्णा आणि अंकिता रैना जोडी पुढच्या फेरीत दाखल. कोरियाच्या जोडीवर ६-३, २-६, ११-९ ने केली मात

16:56 (IST)21 Aug 2018
जलतरण - ५० मी. फ्रिस्टाईल

महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे प्रयत्न पडले तोकडे, अवघ्या एका सेकंदाच्या फकामुळे वीरधवलं कांस्यपदक हुकलं

16:55 (IST)21 Aug 2018
कबड्डी

दक्षिण कोरियाकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचं दमदार पुनरागमन. थायलंडवर ४९-३० ने केली मात

15:24 (IST)21 Aug 2018
एशियाड २०१८ - Sepaktakraw

थायलंडची भारतावर २-० ने मात. मात्र उपांत्य फेरीपर्यंत पोहचल्यामुळे भारतीय संघही कांस्यपदकाचा मानकरी. भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर

15:10 (IST)21 Aug 2018
पंतप्रधान मोदींकडून सौरभ चौधरीचं अभिनंदन

१० मी. एअर पिस्तुल प्रकारात सौरभला सुवर्णपदक

15:07 (IST)21 Aug 2018
कुस्ती

मनिष, किरण बिश्नोई या मल्लांचं आव्हान संपुष्टात. दिब्या काकरानला रेपिचाजमध्ये कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी

15:04 (IST)21 Aug 2018
नेमबाजी

दुहेरी ट्रॅप नेमबाजीतून भारताचे लक्ष्य शेरॉन आणि श्रेयसी सिंह पदकाच्या शर्यतीमधून बाहेर

14:59 (IST)21 Aug 2018
दुखापतीमुळे भारताचा मनिष स्पर्धेतून बाहेर

६७ किलो वजनी गट ग्रेको रोमन प्रकारात भारताचा मनिष दुखापतीमुळे पदकाच्या शर्यतीमधून बाहेर

13:38 (IST)21 Aug 2018
टेनिस

भारताचे रोहन बोपण्णा आणि दिवीज शरणची उपांत्यपूर्व फेरीत धडक. थायलंडच्या जोडीवर मात.

सुमीत नागल, रामकुमार जोडीची चीन तैपेई जोडीवर ७-६ (५), ७-६ (२) ने केला पराभव. भारतीय जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल

13:34 (IST)21 Aug 2018
महिला कुस्ती

७६ किलो वजनी गटात भारताची किरण कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून ४-२ ने पराभूत. दिव्या काकराननेही गमावला सामना.

13:15 (IST)21 Aug 2018
टेनिस महिला एकेरी

भारताच्या अंकिता रैनाची जपानच्या होजुमी एरीवर ६-१, ६-२ ने मात. अंकिता उपांत्यपूर्व फेरीत दाखल

13:07 (IST)21 Aug 2018
कुस्ती पुरुष

६७ किलो वजनी गट ग्रेको रोमन प्रकारात भारताचा मनीष उपांत्यपूर्व फेरीत दाखल. जपानच्या प्रतिस्पर्धी मल्लावर ७-३ ने केली मात

13:03 (IST)21 Aug 2018
नेमबाजांकडून भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर, संजीव राजपूतला रौप्यपदक

५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्य पदकाची कमाई केली आहे. सौरभ चौधरी - अभिषेक वर्मा जोडीनंतर संजीवने भारताच्या खात्यात नेमबाजीमधून आणखी एक पदक टाकलं आहे.

12:12 (IST)21 Aug 2018
ट्रॅप नेमबाजी सांघिक

भारतीय चमू अंतिम फेरीत दाखल

11:28 (IST)21 Aug 2018
महिला कबड्डी

दुसऱ्या साखळी सामन्यात भारताची इंडोनियशावर ५४-२२ ने मात

10:00 (IST)21 Aug 2018
नेमबाजी - १० मी. एअर पिस्तुल

भारताचा १६ वर्षीय युवा खेळाडू सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा अंतिम फेरीसाठी पात्र. पात्रता फेरीत सौरभ पहिल्या क्रमांकावर. अंतिम फेरीत सौरभला सुवर्ण तर अभिषेक वर्माला कांस्यपदक

09:46 (IST)21 Aug 2018
महिला व्हॉलीबॉल

व्हिएतनामकडून भारतीय महिला संघ पराभूत, सरळ ३ सेट्समध्ये केली मात

09:42 (IST)21 Aug 2018
जलतरण पुरुष - महाराष्ट्राचा वीरधवल खाडे अंतिम फेरीत

५० मी. फ्रीस्टाईल प्रकारात वीरधवल खाडे अंतिम फेरीत. संध्याकाळी साडेचार वाजता खेळणार

08:39 (IST)21 Aug 2018
रोविंग

महाराष्ट्राचा दत्तु भोकनळ सिंगल स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत

08:12 (IST)21 Aug 2018
जलतरण

५० मी. फ्रीस्टाईल प्रकारात भारताच्या अंशुल कोठारीने पहिली फेरी जिंकली. महाराष्ट्राचा वीरधवल खाडेही दुसऱ्या फेरीत दाखल

08:11 (IST)21 Aug 2018
महिला कबड्डी

भारतीय संघाची श्रीलंकेवर ३८-१२ ने मात