28 February 2021

News Flash

Asian Games 2018 : सांघिक नौकानयनात भारताला सुवर्णपदक, पिस्तुल नेमबाजीत हिना सिद्धुला कांस्यपदक

सहाव्या दिवसाच्या खेळाचे लाईव्ह अपडेट्स

सुवर्णपदक विजेता भारतीय नौकानयन संघ

आशियाई क्रीडा  स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय नौकानयनपटूंनी धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाने ६:१७:१३ अशी आश्वासक वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं सुवर्णपदक ठरलं आहे. भारताच्या दत्तू भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह या चौकडीने भारताला नौकानयनात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी सकाळच्या सत्रात दुष्यंतने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दुष्यंतने ७:१८:७६ अशी वेळ नोंदवली. या प्रकारात कोरियाच्या खेळाडूला सुवर्ण तर हाँग काँगच्या खेळाडूला रौप्यपदक मिळालं. यापाठोपाठ भारताच्या रोहित कुमार – भगवान सिंह जोडीलाही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक मिळालं.

दुसरीकडे १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताची मनू भाकेर पुन्हा एकदा शर्यतीमधून बाहेर पडली. मात्र भारताच्या हिना सिद्धुने कांस्यपदकाची कमाई करत भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं. याचसोबत जलतरण, बॉक्सिंगमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र वेटलिफ्टींग प्रकारात भारताच्या राखी हलदर पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.

 

Live Blog

Highlights

 • 14:44 (IST)

  कबड्डी - महिला

  अंतिम फेरीत भारतीय महिला संघ इराणकडून पराभूत २७-२४ च्या फरकाने केली मात. भारतीय महिलांना रौप्यपदकावर मानावं लागणार समाधान

 • 11:58 (IST)

  नेमबाजी - महिला

  १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या हिना सिद्धुला कांस्यपदक, मनू भाकेरच्या पदरी पुन्हा एकदा अपयश

 • 11:49 (IST)

  टेनिस - पुरुष दुहेरी

  भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर. रोहन बोपण्णा-दिवीज शरण जोडीची कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६-३, ६-४ ने मात

 • 09:13 (IST)

  नौकानयनपटूंचा धडाका सुरुच - सांघिक प्रकारात भारताच्या संघाला सुवर्णपदक

 • 09:07 (IST)

  नौकानयनात भारताला आणखी एक पदक - रोहित कुमार - भगवान सिंह जोडीला कांस्य

  भारताच्या रोहित कुमार आणि भगवान सिंह जोडीला लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक

 • 08:17 (IST)

  रोविंग - (नौकानयन) सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात पहिलं पदक

  भारताच्या दुष्यंत चौधरीला सिंगल लाईटवेट स्कल्स प्रकारात कांस्यपदक

21:44 (IST)24 Aug 2018
हॉकीत भारताचा जापानवर मोठा विजय

हॉकीत साखळी गटात भारताने आणखी एका मोठया दिमाखदार विजयाची नोंद केली. भारताने जापानवर तब्बल ८-० गोल फरकाने विजय मिळवला. भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. 

18:21 (IST)24 Aug 2018
बॅडमिंटन - पुरुष

एकेरीत भारताच्या पदरी आणखी एक निराशा, एच.एस.प्रणॉय सलामीच्या सामन्यातूनच बाहेर

18:09 (IST)24 Aug 2018
कबड्डी - पुरुष

इराणच्या संघाला सुवर्णपदक, अंतिम फेरीत कोरियावर केली मात. महिला संघालाही सुवर्णपदकाचा मान

18:09 (IST)24 Aug 2018
बॉक्सिंग - ६९ किलो वजनीगट

भारताचा बॉक्सर मनोज कुमार पुढच्या फेरीत दाखल

18:03 (IST)24 Aug 2018
जलतरण - पुरुष

५० मी. ब्रेस्ट्रोक प्रकारात भारताचा संदीप शेजवळ अंतिम फेरीत सातव्या स्थानावर

18:02 (IST)24 Aug 2018
बॉक्सिंग - पुरुष

५२ किलो वजनीगटात भारताला गौरव सोळंकी पराभूत. जपानी प्रतिस्पर्धी खेळाडूने केली मात

18:00 (IST)24 Aug 2018
बॅडमिंटन - महिला दुहेरी

आश्विनी पोनाप्पा-एन. सिकी रेड्डी जोडीची मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्यावर मात. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश 

16:10 (IST)24 Aug 2018
बॅडमिंटन - पुरुष

भारताच्या किदम्बी श्रीकांतला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का, हाँग काँगच्या प्रतिस्पर्ध्याने २१-२३, १९-२१ अशी केली मात

16:09 (IST)24 Aug 2018
स्क्वॅश - पुरुष

उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या सौरव घोषालची आपलाच सहकारी हरिंदरपाल सिंहवर ३-१ ने मात. सौरव उपांत्य फेरीत दाखल

16:04 (IST)24 Aug 2018
स्क्वॅश - महिला

भारताचं आणखी एक पदक निश्चीत, दिपीका पल्लीकलची प्रतिस्पर्ध्यावर ३-० ने मात

16:03 (IST)24 Aug 2018
जिमनॅस्टीक

दिमा कर्माकर अंतिम फेरीत पाचव्या स्थानावर, भारताची पदकाची आशा संपली

16:02 (IST)24 Aug 2018
तिरंदाजी

इराणची भारतावर १५५-१५३ ने मात

14:44 (IST)24 Aug 2018
कबड्डी - महिला

अंतिम फेरीत भारतीय महिला संघ इराणकडून पराभूत २७-२४ च्या फरकाने केली मात. भारतीय महिलांना रौप्यपदकावर मानावं लागणार समाधान

11:58 (IST)24 Aug 2018
नेमबाजी - महिला

१० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या हिना सिद्धुला कांस्यपदक, मनू भाकेरच्या पदरी पुन्हा एकदा अपयश

11:49 (IST)24 Aug 2018
टेनिस - पुरुष दुहेरी

भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर. रोहन बोपण्णा-दिवीज शरण जोडीची कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६-३, ६-४ ने मात

11:16 (IST)24 Aug 2018
हँडबॉल - पुरुष

भारताची पाकिस्तानवर २८-२७ ने मात

09:57 (IST)24 Aug 2018
नेमबाजी - पुरुष

३०० मी. स्ट्रँडर्ड रायफल प्रकारात भारताचे हरजिंदर सिंह आणि अमित कुमार पात्रता फेरीत चौथ्या व पाचव्या स्थानावर. भारताची पदकाची आशा संपली

09:42 (IST)24 Aug 2018
नेमबाजी - महिला

१० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताची हिना सिद्धु आणि मनू भाकेर अंतिम फेरीत दाखल

09:37 (IST)24 Aug 2018
भारताच्या नौकानयनपटूंची मेहनत फळाला
09:13 (IST)24 Aug 2018
नौकानयनपटूंचा धडाका सुरुच - सांघिक प्रकारात भारताच्या संघाला सुवर्णपदक
09:08 (IST)24 Aug 2018
जलतरण - पुरुष

५० मी. ब्रेस्क्टोक प्रकारात भारताचा संदीप शेजवळ अंतिम फेरीत

09:07 (IST)24 Aug 2018
नौकानयनात भारताला आणखी एक पदक - रोहित कुमार - भगवान सिंह जोडीला कांस्य

भारताच्या रोहित कुमार आणि भगवान सिंह जोडीला लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक

08:17 (IST)24 Aug 2018
रोविंग - (नौकानयन) सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात पहिलं पदक

भारताच्या दुष्यंत चौधरीला सिंगल लाईटवेट स्कल्स प्रकारात कांस्यपदक

टॅग : Asian Games 2018
Next Stories
1 ‘कोणी ग्रिप बदलायला सांगितलं, तर माझ्याशी बोलायला सांग’, सचिनचा पृथ्वीला सल्ला
2 Asian Games 2018: रणनीतीच चुकली!
3 Asian Games 2018: तांत्रिक चुकीमुळे दत्तू पदकापासून वंचित
Just Now!
X