Asian Games 2018 Live : आशियाई खेळांच्या सातव्या दिवशी भारताने अखेर सुवर्ण पदक पटकावले. गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग याने भारताला सुवर्णकमाई करून दिली. त्याने २०.७५ मीटरची विक्रमी फेक केली आणि भारताला आजच्या दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

त्याआधी स्क्वॅशमध्ये दिपीका पल्लिकल हिने कांस्यपदकाची कमाई करत आपले खाते उघडले होते. दिपीका पल्लिकलला उपांत्य सामन्यात मलेशियाच्या निकोल अॅन डेव्हिडकडून पराभव पत्करावा लागला. निकोलने दिपीकावर ७-११, ९-११, ६-११ अशा ३ सरळ सेट्समध्ये मात केली. दिपीकाचं आशियाई खेळांमधलं हे तिसरं पदक ठरलं आहे. २०१४ साली झालेल्या एशियाड स्पर्धेत दिपीकाने सांघिक आणि एकेरी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. दुसरीकडे भारताच्या जोशना चिनप्पालाही कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मलेशियाच्या शिवसंगरी सुब्रमण्यमने जोशनाचा पराभव केला. त्यापाठोपाठ जोशना चिनप्पा, सौरव घोषाल यांनीहि भारताला कांस्यपदकाची कमाई केली.

याव्यतिरीक्त अॅथलेटिक्समध्ये भारताच्या मोहम्मद अनसने ४०० मी. शर्यतीमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. याचसोबत बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

Live Blog

20:52 (IST)25 Aug 2018
महिला हॉकी

भारतीय महिला संघाने केला द.य कोरीया संघाचा ४-१ ने पराभव. गटात पटकावले अव्वल स्थान
 

19:33 (IST)25 Aug 2018
गोळाफेक पुरुष

तजिंदर पाल सिंगने पटकावले सुवर्ण पदक. गोळाफेकमध्ये भारताला सुवर्ण. २०.७५ मीटरचा केला विक्रम.

18:39 (IST)25 Aug 2018
पुरूष लांबउडी

भारताचा श्रीशंकर अंतिम फेरीसाठी पात्र. ७.८३ मीटर लांब उडी पात्रता फेरी केली पूर्ण

18:13 (IST)25 Aug 2018
१०० मीटर रनिंग

भारताची द्युतीचंद पात्रता फेरीत प्रथम, पुढील फेरीसाठी पात्र. सेमीफायनलमध्ये धडक

17:03 (IST)25 Aug 2018
स्क्वॅश पुरूष

भारताचा सौरव घोषाल उपांत्य फेरीतून बाहेर. भारताच्या खात्यात आणखी एक कांस्यपदक

16:59 (IST)25 Aug 2018
बॅडमिंटन - पुरुष दुहेरी

अटीतटीच्या लढतीत चिनी जोडीची भारताच्या मनु अत्री आणि बी. सुमीत रेड्डी जोडीवर मात

16:18 (IST)25 Aug 2018
स्क्वॅश - महिला

भारताच्या खात्यात आणखी एका कांस्यपदकाची भर, जोशना चिनप्पाला कांस्यपदक

16:15 (IST)25 Aug 2018
बॉक्सिंग - महिला

भारतीय बॉक्सर पवित्राची पाकिस्तानच्या परविना रुख्सानावर मात

16:14 (IST)25 Aug 2018
तिरंदाजी - पुरुष

कोरियाची भारतावर ५-१ ने मात

16:13 (IST)25 Aug 2018
बॅडमिंटन - महिला दुहेरी

भारतीय जोडीचं आव्हान संपुष्टात, आश्विनी पोनाप्पा - एन. सिकी रेड्डी जोडी चिनी प्रतिस्पर्धी जोडीकडून पराभूत

14:50 (IST)25 Aug 2018
स्क्वॅश - महिला

सातव्या दिवशी भारताने खातं उघडलं. महिला एकेरीत दिपीका पल्लीकल उपांत्य फेरीत पराभूत. भारताच्या खात्यात आणखी एका कांस्यपदकाची भर

14:49 (IST)25 Aug 2018
बॅडमिंटन - महिला

पी.व्ही.सिंधूची इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्कावर २१-१२, २१-१५ ने मात, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

12:45 (IST)25 Aug 2018
अॅथलेटिक्स

भारताचा सी. बालसुब्रमण्यम उंच उडीच्या अंतिम फेरीत दाखल

12:44 (IST)25 Aug 2018
तिरंदाजी - महिला

उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिलांचा संघ चीन तैपेईकडून २२१-२०८ ने पराभूत

12:28 (IST)25 Aug 2018
बॅडमिंटन - महिला

सायना नेहवालची उपांत्यपूर्व फेरीत धडक, इंडोनेशियाच्या २१-६, २१-१४ ने मात

11:16 (IST)25 Aug 2018
नेमबाजी - पुरुष

२५ मी. रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताच्या अनिश आणि शिवम शुक्लाचं आव्हान संपुष्टात

10:41 (IST)25 Aug 2018
तिरंदाजी - पुरुष

भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल, व्हिएतनामवर ५-३ ने केली मात

09:57 (IST)25 Aug 2018
व्हॉलिबॉल - पुरुष

भारतीय संघाची मालदिववर २५-१२. २५-२१. २५-१७ ने मात 

09:52 (IST)25 Aug 2018
अॅथलेटिक्स

भारताचा मोहम्मद युनूस याहिया ४०० मी शर्यतीत उपांत्य फेरीत दाखल

09:50 (IST)25 Aug 2018
तिरंदाजी

भारतीय महिलांची मंगोलियावर ५-३ ने मात