News Flash

Asian Games 2018 Day 9 : सुधा, नीना, आय्यासामीला रौप्य; सायनाला कांस्यपदक

दिवसभरात भारताला १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्यपदके

धरून आय्यासामी

Asian Games 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी भारताची पदकसंख्या ४१ झाली आहे. आज दिवसभरात नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक मिळवले. तर नीना वरकील, धरून आय्यासामी, सुधा सिंग यांना रौप्य पदकाची कमाई केली. सायना नेहवानला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सिंधूने मात्र आजचा सामना जिंकून पुढील फेरी गाठली आहे.

भारताचा भालाफेकीपटू नीरज चोप्रा याने आशियाई क्रीडा स्पर्धांच्या नवव्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. निरजने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८८.०६मीटरची सर्वोकृष्ट फेक केली. ४०० मीटर अडथळ्यांची शर्यत पार करून धरून आय्यासामीने भारताच्या खात्यात आणखी एका रौप्यपदकाची भर घातली. या स्पर्धेत भारताचा संतोष कुमारही अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र त्याला पदक मिळवण्यात अपयश आले. या व्यतिरिक्त स्क्वॉशमध्येही भारताच्या सौरव घोषालने कांस्य़पदकाची कमाई केली. लांब उडी महिला गटात भारताच्या नीना वरकील हिला रौप्यपदक तर ३००० मीटर स्टीपल चेस या स्पर्धेत भारताच्या सुधा सिंगने रौप्य पदकाची कमाई केली.

तत्पूर्वी, भारताची फुलराणी सायना नेहवालला आशियाई क्रीडा स्पर्धेत अखेर कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सायनावर २१-१७, २१-१४ अशा दोन सरळ सेट्समध्ये मात केली. ३६ वर्षांनी आशियाई स्पर्धांमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक ठरलं आहे. यिंगवर मात करुन सायना स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल अशी अनेक भारतीय क्रीडा रसिकांना आशा होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात यिंगने पूर्णपणे आपलं वर्चस्व गाजवलं. पहिल्या सेटमध्ये यिंगने सायनाची अक्षरशः दमछाक करवली. मात्र सायनानेही लगेच हार न मानता यिंगला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र यिंगच्या झंजावाती खेळासमोर तिची डाळ शिजू शकली नाही.

दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाही यिंगने चांगली आघाडी घेतली होती. मात्र सायनाने दमदार पुनरागमन करत बरोबरी साधली. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने सामन्यात आपलं आव्हान कायम राखलं होतं. मात्र मध्यांतरानंर यिंगने आपल्या खेळाची गती वाढवत सायनाला बॅकफूटला ढकलण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ एक स्मॅश आणि ड्रॉपचे फटके लगावत यिंगने सायनावर पुन्हा एकदा कुरघोडी केली. अखेर २१-१४  च्या फरकाने दुसरा सेट सहज जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

Live Blog
Highlights
 • 18:40 (IST)

  भालाफेक

  भारताचा भालाफेकीपटू नीरज चोप्रा याने आशियाई क्रीडा स्पर्धांच्या नवव्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 

 • 18:36 (IST)

  लांब उडी महिला

  भारताच्या नीना वरकील हिला रौप्यपदक

 • 18:04 (IST)

  ३००० मीटर स्टीपल चेस

  या स्पर्धेत भारताच्या सुधा सिंगने रौप्य पदकाची कमाई केली

 • 17:38 (IST)

  ४०० मीटर अडथळ्यांची शर्यत

  भारतीय धावपटू धरून आय्यासामीला रौप्यपदक

 • 12:54 (IST)

  बॅडमिंटन महिला

  पी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक, उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर केली मात. बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे

 • 11:21 (IST)

  बॅडमिंटन - महिला

  तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला बॅडमिंटनमध्ये पदक, उपांत्य फेरीत सायना नेहवाल चीन तैपेईच्या खेळाडूकडून पराभूत. कांस्यपदकावर मानावं लागणार समाधान

22:22 (IST)27 Aug 2018
मुष्टियुद्ध

विकास कृष्णनकडून पाकिस्तनाच्या तन्वीर अहमदचा ५-० ने पराभव. 'अंतिम ८' च्या फेरीत प्रवेश

22:20 (IST)27 Aug 2018
टेबल टेनिस

भारताची जपानवर ३-१ ने मात

20:00 (IST)27 Aug 2018
मुष्टियुद्ध पुरुष

अंतिम १६च्या फेरीत भारताच्या मोहम्मद हुसामुद्दीनचा मंगोलियाच्या खरखू एन्थ-अमर यांच्याकडून पराभव

19:59 (IST)27 Aug 2018
८०० मीटर धावणे

भारताचे जीन्सन जॉन्सन आणि मनजीत सिंग अंतिम फेरीसाठी पात्र

18:40 (IST)27 Aug 2018
भालाफेक

भारताचा भालाफेकीपटू नीरज चोप्रा याने आशियाई क्रीडा स्पर्धांच्या नवव्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 

18:36 (IST)27 Aug 2018
लांब उडी महिला

भारताच्या नीना वरकील हिला रौप्यपदक

18:04 (IST)27 Aug 2018
३००० मीटर स्टीपल चेस

या स्पर्धेत भारताच्या सुधा सिंगने रौप्य पदकाची कमाई केली

17:38 (IST)27 Aug 2018
४०० मीटर अडथळ्यांची शर्यत

भारतीय धावपटू धरून आय्यासामीला रौप्यपदक

17:30 (IST)27 Aug 2018
मुष्टीयुद्ध

अंतिम १६ च्या फेरीत भारताचा अमित विजयी. पुढील फेरीत प्रवेश

17:26 (IST)27 Aug 2018
४०० मीटर धावणे

अनु राघवन आणि जौना मुरमू पदकाच्या शर्यतीतून बाहेर.  ४ थ्या आणि ५व्या क्रमांकावर मानावे लागले समाधान

17:01 (IST)27 Aug 2018
टेबल टेनिस - पुरुष सांघिक

भारताची व्हिएतनामवर ३-० ने मात, भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल

16:59 (IST)27 Aug 2018
बॉक्सिंग - पुरुष

७५ किलो वजनी गटात भारताचा विकास विकास क्रिशनची पाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ५-० ने मात

14:33 (IST)27 Aug 2018
स्क्वॉश - महिला

भारतीय संघाची इराणवर ३-० ने मात

14:05 (IST)27 Aug 2018
हॉकी - महिला

भारतीय संघाची थायलंडवर ५-० ने मात, कर्णधार राणी रामपालची हॅटट्रीक

14:04 (IST)27 Aug 2018
कराटे - पुरुष

भारताचा विशाल ८४ किलो वजनी गटात उझबेगिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत

13:15 (IST)27 Aug 2018
Canoe/Kayak Sprint

रेपिचाज राऊंडमध्ये भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर, भारत उपांत्य फेरीत दाखल

13:12 (IST)27 Aug 2018
स्क्वॉश - पुरुष सांघिक

भारतीय संघाची इंडोनेशियावर ३-० ने मात

12:54 (IST)27 Aug 2018
बॅडमिंटन महिला

पी. व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक, उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर केली मात. बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे

12:22 (IST)27 Aug 2018
व्हॉलिबॉल - महिला

चीनची भारतावर ३-० ने मात

12:00 (IST)27 Aug 2018
टेबल टेनिस - पुरुष

भारताची मकाऊवर ३-० ने मात

11:21 (IST)27 Aug 2018
बॅडमिंटन - महिला

तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारताला बॅडमिंटनमध्ये पदक, उपांत्य फेरीत सायना नेहवाल चीन तैपेईच्या खेळाडूकडून पराभूत. कांस्यपदकावर मानावं लागणार समाधान

10:04 (IST)27 Aug 2018
Sepak Takrav

भारतीय पुरुष संघाची नेपाळवर २-० ने मात

09:42 (IST)27 Aug 2018
कराटे

भारताचा शरथ कुमार जयेंद्रन कोरियाच्या मुली किमकडून १-० ने पराभूत

टॅग : Asian Games 2018
Next Stories
1 Asian Games 2018 : भारतीय पुरुष संघही उपांत्य फेरीत
2 Asian Games 2018 : मातब्बर कबड्डीपटू द्विधा मन:स्थितीत
3 Asian Games 2018 : सायना आणि सिंधू उपांत्य फेरीत
Just Now!
X