27 September 2020

News Flash

Asian Games 2018 : भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण, रोहन बोपण्णा-दिवीज शरण जोडी विजयी

२०१८ एशियाड स्पर्धेत टेनिसमध्ये भारताचं पहिलं सुवर्णपदक

दिवीज शरण आणि रोहन बोपन्ना

भारतीय टेनिस संघाने इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीने कझाकिस्तानच्या जोडीवर मात केली.

कझाकिस्तानच्या डेनिस येवस्येव आणि अलेक्झांडर बब्लिक यांच्याविरुद्ध खेळणाऱ्या भारतीय जोडीने पहिल्या सेटमध्ये आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. दोन्ही खेळाडूंना रोहन आणि दिवीजने पुनरागमन करण्याची संधी दिलीच नाही. अखेर ६-३ च्या फरकाने पहिला सेट जिंकत भारतीय जोडीने सामन्यात आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये कझाकिस्तानच्या जोडीने भारतीय जोडीला चांगली टक्कर दिली. बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीला जोरदार प्रत्युत्तर देत कझाकिस्तानच्या खेळाडूंनी सेटमध्ये २-२ अशी बरोबली साधली. यावेळी रोहन बोपण्णाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत सामन्यावरील आपली पकड ढिली होणार नाही याची काळजी घेतली. अखेर दुसरा सेट ६-४ च्या फरकाने खिशात घालत भारतीय जोडीने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 11:53 am

Web Title: asian games 2018 indonesia india bags its first medal in tennis rohan bopanna divij sharaj pair beat kazakhstan opponent in final
Next Stories
1 Asian Games 2018 Kabaddi : कर्णधाराचा अतिआत्मविश्वास आम्हाला नडला – प्रशिक्षक राम मेहर सिंह
2 Asian Games 2018 : सांघिक नौकानयनात भारताला सुवर्णपदक, पिस्तुल नेमबाजीत हिना सिद्धुला कांस्यपदक
3 ‘कोणी ग्रिप बदलायला सांगितलं, तर माझ्याशी बोलायला सांग’, सचिनचा पृथ्वीला सल्ला
Just Now!
X