News Flash

Asian Games 2018 : १५०० मी. शर्यतीत भारताच्या जिनसन जॉन्सनला सुवर्णपदक

भारताचा मनजीत चौथ्या स्थानावर

सुवर्णपदक विजेता जॉन्सन

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बाराव्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. १५०० मी. शर्यतीत भारताच्या जिनसन जॉन्सनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आजच्या दिवसातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. याच क्रीडा प्रकारात भारताला मनजीत सिंह देखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता, मात्र अखेरीस तो चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे भारताला एकाच पदकावर समाधान मानावं लागलं.

३:४४:७२ अशी वेळ नोंदवत जॉन्सनने सुवर्णपदकाची कमाई केली. याआधी बुधवारी झालेल्या ८०० मी. शर्यतीत जॉन्सनने रौप्यपदकाची कमाई केली होती. मात्र त्या स्पर्धेतली कसर भरुन काढत जॉन्सनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

Next Stories
1 बुमराहने पुन्हा घेतली ‘नो बॉल’वर विकेट; नेटकऱ्यांनी झोडपले
2 Asian Games 2018 : भूमीपुत्र नसल्यामुळे सुवर्णपदक विजेत्या अरपिंदरला हरियाणा सरकारने बक्षिस नाकारलं
3 Ind vs Eng : ३९ व्या कसोटीत विराट कोहलीने मोडली परंपरा
Just Now!
X